कृष्णा रुग्णालयातील आणखी 6 रुग्ण कोरोनामुक्त ; रुग्णांना पुष्पगुच्छ देवून निरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टर्सनी केलेल्या उपचारामुळे आणि नर्सिंग स्टाफने घेतलेल्या विशेष काळजीमुळे रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत. कृष्णा रुग्णालयातील कोरोनाचे 6 रुग्ण शुक्रवारी कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना मुक्त झालेल्या सहा जणांचे डॉक्टर्स, नर्स यांनी टाळ्या वाजवून पुष्पगुच्छ देवून स्वागत केले आहे. अशी माहिती डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.

कराड तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या ८६ वर पोहचली असून, त्यात सर्वाधिक ३६ रुग्ण कराड नजीकच्या वनवास माचीतील आहेत. तर, निष्पन्न झालेल्या रुग्णांपैकी बहुतेक रुग्ण हे कराड व मलकापूर शहरासह त्यालगतच्या १० किलोमीटरमधील असून, या रुग्णसाखळीने करोनाबाधितांची संख्या धडकी भरवणारी ठरली आहे. हे सर्व रुग्ण कृष्णा हॉस्पीटल व येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत.

कृष्णा रुग्णालयातून आजवर १२ करोनाग्रस्त उपचारांती सुखरूप आपल्या घरी परतले आहेत. त्यात डेरवण (ता. पाटण) येथील १० महिन्याच्या बालकाचा समावेश आहे. सध्या रुग्णालयात ४० हून अधिक करोनाबाधित उपचार घेत असून, हे सर्व रुग्ण लवकरात लवकर उत्तम आरोग्यस्वास्थ्य घेऊन पुन्हा घरी परततील असा विश्वास डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment