दही हंडीत भरतात त्या गोपाळ काल्याची रेसीपी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खाऊ गल्ली |  आज कृष्ण जन्माष्टीमीच्या दोन दिवसाच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. उद्या दहीहंडी फोडून या जन्माष्टमीची सांगता होणार आहे. दहीहंडीच्या उत्सवाला गोपाळ काला असे देखील संबोधले जाते. भागतव / वारकरी सांप्रदायात काल्याच्या कीर्तनाने सात दिवसाच्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होते. यावेळी प्रसाद म्हणून वाटला जाणारा काला आणि दहीहंडीत भरला जाणारा काला दोन्ही एकच असतात. मात्र या काल्याची रेसीपी परंपरेने पिढ्यान पिढ्या चालत आली आहे. ती रेसिपी पुढील प्रमाणे.

साहित्य : जाड पोहे पाव किलो, दही पाव किलो, साखर, ज्वारीच्या लाह्या, चुरमुरे २ वाट्या, ओल्या नारळाचा खीस डाळिंबाचे दाणे, एक पेरू चिरून, साजूक तूप, जिरे, हिंग, हिरवी मिर्ची, आलं,

कृती : जाड पोहे भिजवून घ्या. एका मोठ्या भांडयात दही घ्या त्यात चवीनुसार साखर आणि थोडं मीठ घालून घ्या. त्यानंतर त्यात भिजवलेले पोहे घालून मिश्रण एक जीव करून घ्या. नंतर त्यात दोन मोठे चमचे नारळाचा खिस, चिरलेला एक पेरू, दोन वाट्या डाळिंबाचे दाणे घालून पुन्हा मिश्रण एक जीव करून घ्या. नंतर त्यात २ वाट्या चुरमुरे भाजून घाला. त्यानंतर अर्धी वाटी ज्वारीच्या लाह्या घाला. काल्याचे हे मिश्रण बाजूला ठेवून एका कढईत फोडणीसाठी साजूक तूप घ्या. तुपाला ताव आल्या नंतर त्यात जिरे, हिंग, ठेचलेल्या तीन-चार हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा आल्याची पेस्ट घालून फोडणी तडतडू द्या. त्यानंतर हि फोडणी काल्याच्या मिश्रणात घाला. एक बाब लक्षात ठेवण्यासाठी अशी की , या फोडणीत हळदीचा वापर करत नाहीत. काला तयार झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाला नेवैद्य दाखवावा तसेच हंडीत भरून दही हंडीचा आनंद लुटावा.

Leave a Comment