KTCL Goa Bharti 2024 | नोकरी शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक उमेदवारांना झालेला आहे. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा यांच्या अंतर्गत भरती चालू झालेली आहे. ही भरती कंडक्टर या पदासाठी आहे. या पदाच्या एकूण 70 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे 21 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत
पदाचे नाव | KTCL Goa Bharti 2024
या भरती अंतर्गत कंडक्टर या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहे
रिक्त पदसंख्या
या भरती अंतर्गत ७० रिक्त पदे भरली जाणार आहेत.
नोकरीचे ठिकाण
या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला गोवा या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
वयोमर्यादा
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 45 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.
अर्ज पद्धती | KTCL Goa Bharti 2024
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड पारा यसो गोवा अल्टो पोर्वोरिम बारदेझ गोवा 403521
अर्ज करण्याची शेवटची तारीख
21 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
शैक्षणिक पात्रता
उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असणे गरजेचे आहे.
वेतन श्रेणी
या भरती अंतर्गत निवड झाल्यावर उमेदवाराला दररोज 733 रुपये हजेरी मिळेल.
अर्ज कसा करावा ?
या भरतीचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज करू शकता.
21 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.