कुचिक बलात्कार प्रकरणाला नवे वळण; पीडित तरुणीचे चित्रा वाघ यांच्यावरच गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पिडीत तरुणीने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चित्रा वाघ यांनी माझ्यावर दबाव टाकला असा आरोप सदर पीडित तरुणीने केल्यामुळे चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण लागले आहे.

खर तर चित्रा वाघ यांनीच रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरण धरून लावलं होत मात्र आता खुद्द पिडीत तरुणीनेच चित्रा वाघ यांच्यावर आरोप करताना म्हंटल की, वाघ यांनी माझ्यावर दबाव टाकत विशिष्ट जवाब देण्यास मला भाग पाडले आणि माझ्या मोबाईलमधून एका अॅपच्या सहाय्याने मेसेज पाठविण्यात आले. वाघ यांनी गोव्यात मला डांबून ठेवलं होतं, असंही तरुणीने म्हटलं आहे. साम टीव्ही ने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी यानंतर चित्रा वाघ यांच्यावर कारवाईचे स्पष्ट संकेत दिले आहेत. पीडितेने मला फोन केला होता. माझ्यावर दबाव आहे मला खरी माहीती आहे ती मी तुम्हाला भेटून सर्व काही सांगते असं ती म्हणाली आहे. त्यामुळे तीला भेटून सर्व कारवाई केली जाईल. तसंच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असही चाकणकर म्हणाल्या. आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं गेलं आहे. सत्तेसाठी एवढ्या खालच्या पातळीवर राजकारण सत्तेसाठी करु नये, असा टोला रुपाली चाकणकर यांनी भाजपला लगावला.