द हेग | कुलभूषण जाधव यांच्या फाशीला द हेगच्या अंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पाकिस्तानच्या काळ्या नीतीच्या विरोधात भारताने हा अत्यंत मोठा विजय मिळवला असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानी न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा हि सर्व नियम धाब्यावर बसवून सुनावलेली शिक्षा होती असे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने म्हणले आहे.
व्हिएन्ना या आंतरराष्ट्रीय कराराचे उल्लंघन करून कुलभूषण जाधव यांना अटक केली. त्यांच्यावर पाकिस्तानात जो खटला चालवला तो खटला देखील या कराराच्या विरोधात होता. त्यामुळे कुलभूषण जाधव यांना सुनावलेली शिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे असे कोर्टाने या खटल्याचा निकाल देताना सुनावले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विधिज्ञ हरीश साळवे या खटल्यात भारताची बाजू मांडत होते. १५ कोटी रुपयांपर्यंतची एका खटल्याची फी आकारणारे हरीश साळवे कुलभूषण जाधव यांचा खटला फक्त एक रुपयांची फी घेतली होती.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान लष्कराने अटक केली होती. जाधव हे आतंरराष्ट्रीय व्यापारी असून ते व्यापारी कामा निमित्त अफगाणिस्तान येथे गेले असता त्यांना पाकिस्तानने अटक केली होती. त्यानंतर त्यांच्यावर हेरगिरीचे आरोप ठेवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याला आता स्थगिती देण्यात आली आहे.