टीम हॅलो महाराष्ट्र। भारतीय सेना दिवसाच्या निमित्ताने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय सैन्याला शुभेच्छा देणारा संदेश ट्विटरवर टाकला होता. काही दिवसांपूर्वी भारतीय सैन्याच्या विश्वासार्हतेवर अरविंद केजरीवाल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. याचा आधार घेत पूर्वाश्रमीचे आप नेते कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ८ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. त्यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापले असून, एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. यातच केजरीवाल यांच्या एका ट्विटवरून कवी कुमार विश्वास यांनी टीका केली आहे.
केजरीवाल यांनी लष्कर दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. केजरीवाल यांचं ट्विट कुमार विश्वास यांनी रिट्विट करून उत्तर दिलं आहे. “चुनाव पण खूप अवघड गोष्ट आहे. लष्कराच्या पराक्रमावर प्रश्न उपस्थित करून जगात भारताला आणि भारतीय लष्कराला संशयाच्या फेऱ्यात उभं केलं होतं. तेच आज लष्कराला शुभेच्छा देत आहे,” असं विश्वास यांनी म्हटलं आहे.
चुनाव भी क्या ज़ालिम चीज़ है, सेना के पराक्रम पर सवाल उठाकर पूरी दुनिया में भारत और भारत की सेना को कठघरे में खड़े करने वाले सेना को बधाई दे रहे हैं ???????????? https://t.co/lVuqe0v4QH
— Dr Kumar Vishvas (@DrKumarVishwas) January 15, 2020