हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हिंदी कवी आणि शायर कुमार विश्वास यांची काळ्या रंगाची फॉर्च्युनर गाडी त्यांच्या राहत्या घराजवळून चोरीला गेली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असं आश्वासन पोलिसांनी दिलं. या चोरीच्या घटनेबाबत कुमार विश्वास यांच्या घराशेजारी राहणाऱ्या शेजाऱ्यांचीही चौकशी पोलिसांनी केली. पोलीस या प्रकरणी सीसीटीव्हीही तपासून पाहात आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी शक्य तेवढी पावलं उचलण्याचं काम पोलीस करत आहेत.
शनिवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही गाडी चोरीला गेल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. कुमार विश्वास हे आपल्या देशातले एक लोकप्रिय कवी आहेत. त्यांचं लिखाण, त्यांच्या कविता, त्यांची कविता सादर करण्याची शैली ही सगळ्यांच्याच पसंतीस उतरते. तरुण वर्गात त्यांची जास्त क्रेझ आहे. कुमार विश्वास हे काळ आप या पक्षातही होते. मात्र अंतर्गत मतभेदातून त्यांनी अरविंद केजरीवाल यांची साथ सोडली.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.