पुणे प्रतिनिधी | अमित येवले
श्रीयश एज्युकेशन फाऊंडेशन संस्थेच्या ९ व्या वर्धापन दिनानिम्मित राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजय काळे व अध्यक्ष म्हणून डॉ.कुमार सप्तर्षि उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषाणांत डॉ.कुमार सप्तर्षी यांनी अनेक सद्य गोष्टींचा समाचार घेतला. अती अभिमानी वृत्तीमुळे आपला देश मागे राहिला असून, पूर्वी व्यक्ती चांगली असली की त्याला महात्मा म्हणायचे, मात्र आज सत्तेवर कोणी आले की ते देवरूपाला जाते, जणू हे देवांचे अवतारच आहेत, अशा स्वरुवात लोक त्यांना बघतात. महिला सबलिकरणाचे उपक्रम राबवून अर्धव्यवसाय निर्मिती करुन महिलांच्या हातात स्वतःचा पॉकेटमनी उपलब्ध करुन देण्याचे काम श्रीयश फाऊंडेशन करते आहे . हे खूप महत्वाचे कार्य आहे. हया गोष्टींचा परिणाम हा समाजात हळूहळू दिसत असतो. अशा संस्थांचे काम हे राष्ट्रबांधनीचे, समाजबांधनीचे असते. त्यामुळे कुटुंबाच्या सक्षमीकरणासाठी सर्वप्रथम स्त्रीचा जागर केला पाहिजे, तिचे नीट पोषण केले पाहिजे.
आमदार विजय काळे म्हणालेत, व्यावसायिक शिक्षण हे प्रत्येकाकडे कोणत्या तरी स्वरुपात असणे आवश्यक आहे. यांने माणूस हा स्वावलंबी बनत असतो. व्यावसायिक शिक्षणाने बचत गट यांना खूप मोठा फायदा झाला आहे. त्याचमुळे आज अनेक बचत गट हे उभे आहेत. कार्यालयीन नोकरी किंव्हा कारख्याण्यातील नोकरी यांमध्ये अडकण्यापेक्षा व्यवसाय शिक्षण घेवून पुढे जायला हवे. त्यासाठी सामाजिक संस्था हया एक प्रोत्साहनपर माध्यम ठरल्या आहेत.
कार्यक्रमाच्या सुरवातीला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आलेत. याप्रसंगी श्रीयश एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया सावंत, श्रीकृष्ण सावंत, सामाजिक कार्यकर्त्या दुर्गा शुर्के आदि मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे-
आदर्श महिला पुरस्कार
सरिता चितोडकर, अपर्णा जोशी, डिंपल इंगले, स्मिता कसमळकर, श्रद्धा सावर्डेकर, धनश्री ढावरे, शीतल भोसले.
समाजभूषण पुरस्कार
तानाजी धसाल, मछिंद्र चव्हाण, उमेश शिंदे, प्रा.सुनील मोरे, हरी जगताप, अजित नरूटे पाटील, नवनाथ कोल्हे, अनिल रूपनवार
आदर्श पत्रकारिता
सुनील सव्वाशे
कृषीभूषण पुरस्कार
डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. धीरज कणखरे, दादा पवार
कलाभूषण पुरस्कार
श्रीराम सावंत, हेमंत माळवे