कुवैत-अमेरिकेने सुमारे 4000 भारतीयांना केले हद्दपार, यामागील कारण काय होते ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कुवैत शहर । परराष्ट्र मंत्रालयाच्या (External Affair Ministry) कोविड सेल युनिटने तयार केलेल्या अहवालानुसार अमेरिका (America) आणि कुवेत (Kuwait) यांनी 4000 भारतीयांना हद्दपार केले आहे. गेल्या एक वर्षात बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याबद्दल आपली शिक्षा पूर्ण केलेल्या हजारो भारतीयांना स्पेशल फ्लाइट्सने डिपोर्ट केले गेले. काही भारतीय अ‍ॅम्नेस्टीच्या विमानातूनही परत आले.

परराष्ट्र मंत्रालयाने तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे की,”वंदे भारत मिशन अंतर्गत कोरोना साथीमुळे परदेशात अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी गेल्या वर्षी 7 मे रोजी काम सुरू केले होते.” अहवालात म्हटले आहे की, “या फ्लाइट्स बहुतेक कुवेत सरकारद्वारे ऑपरेट केल्या गेल्या. त्याअंतर्गत त्या लोकांना व्हिसाची मुदत संपल्यानंतरही देशात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणार्‍याना भारतात परत पाठविण्यात आले.”

या अहवालात म्हटले आहे की,”कुवैत सरकारने या अ‍ॅम्नेस्टी फ्लाइट्ससाठी पैसे दिले.” हे देखील सूचित करतात की, ही लोकं भारतात परत आल्यावर वर्क व्हिसासाठी पुन्हा अर्ज करू शकतात. त्याच वेळी, भारतात परत आलेल्या लोकांच्या आणखी एका श्रेणी मध्ये ती लोकं होती ज्यांनी इतर देशातील तुरूंगवासाची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांना परत भारतात आणण्यात आले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment