हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल2020 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. काल सनरायझर्स हैदराबादविरोधात स्पर्धेतील पाचवा सामना हरल्यानंतर आता प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी पंजाबला पुढील सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे नेट रनरेट वरही लक्ष ठेवावे लागेल. परंतू एवढे सामने हरून देखील पंजाबच्या संघाने अजूनही धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलला अजूनही संधी का दिली नाही असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. चाहत्यांच्या या प्रश्नाचे उत्तर प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी दिल आहे.
ख्रिस गेलला हैदराबादविरूद्धच्या सामन्यात बाहेर का ठेवले याबत पंजाबचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी म्हटले आहे की, या सामन्यात ख्रिस गेलला खेळवणार होतो, पण दोन दिवसांपासून त्याची तब्येत खराब आहे. त्याला फूड पॉयझनिंग झालं आहे. त्यामुळे तो या सामन्यात खेळू शकला नसल्याचे कुंबळे यांनी स्पष्ट केलं आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात पंजाबचा मोठा पराभव झाला आहे. हैदराबादनी दिलेलं 202 धावांचं आव्हान पंजाबला पार करता आलं नाही. सुरुवातीपासून फलंदाजांची दमछाक झाल्याचं चित्र होतं. त्यात पुरन याने एकट्याने लढा दिला मात्र, त्याला कोणीही साथ दिली नाही. अखेर पंजबाचा या 69 धावांनी सामन्यात पराभव झाला.
पंजाबला आता आयपीएलमध्ये टिकायचं असेल तर सर्वच सामने जिंकावे लागणार आहेत. कारण ते सहा पैकी पाच सामन्यात पराभूत झाले असून गुणतक्त्यात सर्वांत शेवटी आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.त्यांना सर्व सामने जिंकावे लागणार तर आहेतच पण दुसऱ्या संघाच्या पराभवासाठी प्रार्थनाही करावी लागणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’