व्यथा मजुरांची|रस्त्यातून चालत जातानाच ‘तिने’ दिला बाळाला जन्म, त्यानंतर बाळासहित चालली तब्बल १६० किलोमीटर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l सरकारने एवढे प्रयत्न केल्यानंतरही काही परप्रांतीय मजूर आपल्या घरी जाण्यासाठी अजूनही पायी प्रवास करताना दिसत आहेत. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र बॉर्डरवर बाळाला जन्म देऊन 1 तासानंतर पुन्हा 160 किलोमीटर पायी प्रवास करणाऱ्या महिलेची कहाणी ही अंगावर शहारे आणणारी आहे.

शकुंतला नावाची ही महिला आपल्या पतीसोबत नाशिकला राहत होती. ही महिला गरोदर असून ती नववा महिना संपत आल्यावर नाशिकमध्ये असणाऱ्या सटाणा या गावापासून मध्यप्रदेशमधील बीजसन या गावी पायी निघाली. हे अंतर जवळपास 1 हजार किलोमीटर आहे. तिने 5 मेला आपल्या घरापासून 160 किलोमीटर अलीकडे असतानाच रस्त्याच्या कडेलाच बाळाला जन्म दिला. एवढंच नाही तर बाळंतीण झाल्यावर या महिलेने आपलं बाळ घेऊन जवळपास 160 किलोमीटरचा प्रवास केला आहे.

ही महिला एवढा प्रवास करून शनिवारी आपल्या पतीसह मध्यप्रदेशमधील बीजसन येथे पोहचली. तेव्हा तेथील चेक-पोस्ट वर असलेल्या इंचार्जे महिलेने शकुंतलाची चौकशी केली. तेव्हा शकुंतलाने हा सर्व घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा तेथील पोलीस कर्मचारी आणि इतरांकडे तर काही शब्दच नव्हते. शकुंतलाचे पती राकेश कौल यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा सांगितलं की प्रवास खूप कठीण होता. मात्र आम्हाला रस्त्यात खूप दयाळू लोक भेटले. एका शीख कुटुंबाने आमच्या नवजात बाळाला कपडे आणि आम्हला रस्त्यात लागणारे आवश्यक ते सामान दिल. नाशिकमध्ये उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे माझी नोकरी गेली. आमच्यावर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे आम्हाला हा खडतर प्रवास करावा लागला. अस शकुंतलच्या पतीने सांगितलं.

Leave a Comment