Lack Of Sleep : कमी झोपण्याची सवय असेल तर, सावधान!! तुम्ही होऊ शकता कॅन्सरचे शिकार

Lack Of Sleep
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Lack Of Sleep) आपली जीवनशैली आपल्या आरोग्यावर परिणाम करत असते. त्यामुळे जीवनशैलीतील लहान सहान गोष्टींवर आपले नियंत्रण असणे गरजेचे असते. पण दगदगीच्या बिघडत चाललेली जीवनशैली आपल्या आरोग्याची वाट लावत चालली आहे. अशातूनच कॅन्सरसारख्या जटील आजाराचे जाळे पसरत चालले आहे. कॅन्सर हा असा आजार आहे जो कोणत्याही वयातील व्यक्तीला होऊ शकतो. त्यामुळे आपण आपल्या आरोग्याची पूर्ण काळजी घेणे गरजेचे आहे.

डोक्यात सुरु असलेले विचार आणि शारीरिक तसेच मानसिक ताण आपल्या झोपेवर गंभीर परिणाम करत असतात. शिवाय काही लोकांना रात्री बराच वेळ मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर वेळ घालवण्याची सवय असते. (Lack Of Sleep) ज्यामुळे झोप पूर्ण होत नाही आणि याचा आरोग्यावर मोठा परिणाम होतो. शांत झोप ही प्रत्येकाला आवश्यक आहे. मात्र तीच झोप न झाल्यामुळे शरीरातील पेशींचे नुकसान होते. ज्यामुळे कॅन्सरसारखा भयंकर रोग होण्याची शक्यता असते. अर्थात अनिद्रा आणि कॅन्सर यांचा एकमेकांशी घनिष्ट संबंध आहे. या विधानाविषयी अधिक आणि सविस्तर माहिती घेऊया.

अपूर्ण झोपेचा कर्करोगाशी काय संबंध आहे? (Lack Of Sleep)

कॅन्सर वर उपचार घेणार्‍यांनी किंवा कॅन्सरचा शरीरावर होणारा हल्ला रोखण्यासाठी पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. अन्यथा कॅन्सर बळावू शकतो असे काही तज्ञांनी म्हटले आहे. एका प्रसिद्ध लाईफस्टाईल एक्सपर्टचे म्हणणे आहे की, ‘आपण जेव्हा शांत झोप घेतो, तेव्हा औषध, अन्न, सप्लिमेंट किंवा मॅजिक ऑईलचा प्रभाव होतो. मात्र कमी झोपेमुळे त्यांचा प्रभाव कमी होतो आणि परिणामी कॅन्सर पेशी सक्रिय होतात’. (Lack Of Sleep) याविषयी सविस्तर सांगताना त्याने काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे :-

Melatonin हे अ‍ॅन्टी कॅन्सर हार्मोन असून हे हार्मोन शरीरासाठी आवश्यक आहे. कारण याचा परिणाम झोपेवर आणि शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर होतो. अर्थात हे हार्मोन कॅन्सरशी देखील कनेक्ट आहे. हे एक प्रभावी अँटीऑक्सीडेंट आहे. आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्या शरीरात melatonin मुक्तपणे संचार करतं. ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती सुधारते. (Lack Of Sleep) दरम्यान, असामान्य आणि शरीराला नुकसान पोहोचवणाऱ्या पेशींना हे हार्मोन शोधून संपवते. मात्र, यासाठी उत्तम आणि पूर्ण झोप आवश्यक आहे.

melatonin च्या चांगल्या निर्मितीसाठी शक्य तितक्या अंधार्‍या ठिकाणी झोपा असेही तज्ञाने म्हटले. यासाठी स्लिप मास्कचा वापर करता येईल. कारण चांगली झोप झाल्याने शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढेल. (Lack Of Sleep) ज्यामुळे शरीरात कॅन्सर वाढण्याची शक्यता कमी होईल. तसेच हे हार्मोन शरीरात इम्यून डिफेन्स म्हणून काम करेल.

एका अभ्यासानुसार, एका रात्रीच्या खराब झोपेनंतर NK पेशींच्या सक्रिय असण्यात ७०% घट दिसून येते. परिणामी रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. शरीरी कमकुवत होऊ लागते. म्हणूनच झोपेला प्राधान्य द्यावे. यामुळे कर्करोगाच्या पेशी शोधून त्यांच्या वाढीस प्रतिबंध घालणाऱ्या रोगप्रतिकारक शक्तीची क्षमता वाढते. (Lack Of Sleep) तसेच प्रक्रिया केलेले अन्न, व्यायाम, तणावाची पातळी, नकारात्मकता, हवामान, सूर्यप्रकाश, तीव्र दाह, अतिनील प्रकाश हे घटक देखील आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतात. तर वेळोवेळी शरीराच्या आरोग्याची तपासणी जरूर करा.