चीनच्या उलट्या बोंबा! म्हणे, भारतीय सैन्यानचं आधी हल्ला केला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लडाख । लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सैन्यात चकमक झाल्याचं वृत्त मंगळवारी समोर आलं. या चकमकीमध्ये भारतीय सैन्यदलातील तिघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ज्यामध्ये दोन जवान आणि एका अधिकाऱ्याचा समावेश असल्याची माहिती समोर आली. दरम्यान, ही बातमी उघडकीस येताच चीनने भारतावरच खळबळजनक आरोप केला आहे.

‘एएफपी न्यूज’चा हवाला देत ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार भारताकडूनच सीमा ओलांडत चीनच्या सैनिकांवर प्रथम हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. चीनच्या या गंभीर आरोपानंतर सोमवारी रात्री झालेल्या या चकमकीमागचं मुख्य कारण समोर आणण्यासाठीच आता भारतीय लष्कर आणि संबंधित अधिकारी प्रयत्नांत असल्याचं पाहायला मिळत आहे.

सदर घटनेची माहिती समोर येताच भारतीय संरक्षण दलांमध्ये मोठ्या हालचाली सुरु झाल्याचं दिसून आलं. ज्यामध्ये सैन्यदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांची आणि परराष्ट्र मंत्र्यांची बैठक घेतली. ज्यामध्ये पूर्व लडाखमध्ये सुरु असणाऱ्या या हालचालींवर प्रकाशझोत टाकण्यात आला असून, काही महत्त्वाच्या मुद्द्यायांवर चर्चा झाली. गेल्या काही दिवसांपासून भारत- चीन सीमेवर चीनच्या सैन्याकडून सुरु असणाऱ्या सर्व हालचाली पाहता चीनकडून करण्यात आलेल्या या आरोपांमध्ये नेमकं किती तथ्य आहे, हासुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment