Ladka Bhau Yojana : ‘लाडकी बहीण’नंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा 10 हजार रुपये; मुख्यमंत्र्यांची घोषणा

laadka bhau yojana eknath shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला आणि मुलींसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा महायुती सरकारकडून करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत सरकार कडून केली जाणार आहे. सरकारच्या या घोषणेनंतर विरोधकांनी मात्र भावासाठी कोणती योजना का आणली नाही असा उलट सवाल केला होता. या पार्श्वभूमीवर आता लाडक्या भावासाठी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये, डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार रुपये, तर पदवीधर युवकांना दरमहा दहा हजार रुपये मिळू शकतात.

आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात विठुरायाची सपत्नीक शासकीय महापूजा केली. यावेळी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी पंढरी महोत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, आपल्या सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना दरमहा १,५०० रुपये, म्हणजेच वर्षाला १८ हजार रुपये दिले जातील. याशिवाय त्यांना दरवर्षी ३ गॅस सिलेंडर मिळणार आहेत. मात्र आमच्या या निर्णयानंतर विरोधकांनी लाडक्या भावांचं काय? असा सवाल आम्हाला केला. परंतु आमचं लाडक्या भावावर सुद्धा लक्ष्य आहे.

लाडका भाऊ योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण तरुणांना दर महिन्याला ६ हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या तरुणाला 8 हजार रुपये आणि पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये दिले जाणार आहेत. हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप (Apprenticeship) करेल, त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी सुद्धा मिळेल. एक प्रकारे आपण स्कील्ड मॅनपावर (कुशल कामगार) तयार करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यसह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण पुरवणार आहोत. आपले तरुण त्यांच्या कामात कुशल व्हावेत, यासाठी सरकार पैसे भरणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशी योजना आणली असून याद्वारे बेरोजगारीवर तोडगा निघेल असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.