Ladki Bahin Yojana : आनंदाची बातमी!! लाडक्या बहिणींच्या खात्यात ‘या’ दिवशी पैसे जमा होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत (Ladki Bahin Yojana) एक महत्वाची माहिती समोर येत आहे. आत्तापर्यंत लाडक्या बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. मात्र सप्टेंबर महिन्याचे १५०० रुपये अजूनही महिलांना मिळाले नाहीत. परंतु आता येत्या २९ तारखेला लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता महिलांच्या बँक खात्यावर जमा केला जाईल. महिला व बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

त्या महिलांना ४५०० रुपये देण्यात येतील – Ladki Bahin Yojana

प्रसारमाध्यमांशी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या, 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होणार आहे. हा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम कार्यक्रम आहे. ज्या महिलांनी सप्टेंबर पर्यंत अर्ज केले आहेत त्यांना त्या दिवशी १५०० रुपयांचा आर्थिक लाभ मिळेल. अशा अनेक महिला आहेत ज्यांच्या अर्जात त्रुटी राहिल्यामुळे त्या महिलांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नव्हता . त्या महिलांनाही एकूण ३ महिन्यांचे ४५०० रुपये देण्यात येतील असं आदिती तटकरे यांनी सांगितले. या तिसऱ्या हप्यात एकूण 2 कोटी महिलांना लाभ दिला जाईल, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.

लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) अर्ज करण्याची प्रक्रिया अजूनही चालूच आहे. लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख ही ३१ ऑगस्टपर्यंत होती. मात्र नंतर राज्य सरकारने याच्या नोंदणीची तारीख पुढे वाढवत ती ३० सप्टेंबरपर्यंत केली आहे. आत्तापर्यंत करोडो महिलांच्या खात्यावर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ३००० रुपये जमा झाले आहेत. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणसाठी लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून राबवण्यात येत आहे, या योजनेमुळे राज्यभरातील महिलावर्गात मोठ्या आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारनं वेगळं पाऊल उचलले आहे, त्यानुसार आता फक्त अंगणवाडी सेविकांकडून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरता येणार आहे.