Ladki Bahin Yojana: महिला दिनी 1500 रुपयेच का आले? आदिती तटकरे यांनी दिल स्पष्टीकरण

0
3
Ladki Bahin Yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ladki Bahin Yojana – काही दिवसांपूर्वी लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) मोठी खुशखबर मिळाली होती कि , सरकार फेब्रुवारी अन मार्चचा हप्ता महिलादिना निमित्त एकत्रितपणे वितरित करणार आहेत. म्हणजेच बहिणींच्या खात्यात 3000 रुपये जमा होतील. त्यामुळे लाखो महिला आनंदी होत्या . पण महिला दिनावेळी महिलांच्या खात्यात फक्त 1500 रुपये आले त्यामुळे अनके महिला नाराज झाल्या आहेत. यासोबतच विरोधकांनी टीकेचा जोर धरला आहे. पण यावर आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे , अन सोशलमिडीयावर एक पोस्ट लिहली आहे. तर हि अपडेट नक्की काय आहे , हे जाणून घेऊयात.

महिला दिनाच्या आधी दोन हप्ते (Ladki Bahin Yojana)

सरकार लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या आधी दोन हप्ते देईल , असे सांगितले होते. पण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात 3000 ऐवजी फक्त 1500 रुपये आल्यानंतर आदिती तटकरे (Aditi Sunil Tatkare) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अन त्यांनी सांगितले होते कि, सरकार फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे 2 टप्यात देणार आहे.

आदिती तटकरेनी काय सांगितले –

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक 7 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे. ही प्रक्रिया दिनांक 12 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये व मार्च महिन्याचे 1500 रुपये असे दोन टप्प्यात एकूण 3000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. पण सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार आहे , त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना निश्चिंत राहण्यास सांगितले आहे” . या विधानामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.