हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ladki Bahin Yojana – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याच्या संदर्भात राज्य सरकारने नकार दिला नाही, पण राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता या योजनेची वाढीव रक्कम देण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो , असे त्यांनी सांगितले आहे. या वक्तव्यामुळे हे स्पष्ट झाले आहे कि , बहिणींना हे 2100 रुपये मिळण्यास अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार (Ladki Bahin Yojana) –
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की, आम्ही लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) 2100 रुपये देऊ.” यावेळी भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला लॉटरीच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्याची सूचना केली. त्यांनी केरळसह अन्य राज्यांतून लॉटरीमधून मिळणाऱ्या महसुलाचा उल्लेख केला. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी सर्वपक्षीय आमदारांची समिती नेमण्याची घोषणा केली आहे , ज्याचे नेतृत्व सुधीर मुनगंटीवार करतील. या समितीला लॉटरीच्या माध्यमातून राज्याचे उत्पन्न वाढविण्याबाबत महिनाभरात अहवाल सादर करावा लागेल.
दर महिन्याला दीड हजार रुपये जमा –
हि योजना सुरु करताना काही अटीशर्ती लावण्यात आला होत्या. ज्यात कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे , चार चाकी वाहन नसावे अशा अनेक अटी लावण्यात आल्या होत्या. अन अशा पात्र महिलांना (Ladki Bahin Yojana) बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा होतात. गेल्या वर्षी या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली होती. अन आतापर्यंत या योजनेचे महिलांना एकूण 9 हप्ते मिळाले आहेत. पण घोषणेनुसार अजून 2100 रुपये महिलांना मिळाले नाहीत.