Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो, 1500 रुपये जमा होण्यास सुरूवात; मोबाईल चेक करा

Ladki Bahin Yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) पात्र महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. खूप दिवसापासून प्रतीक्षेत असलेला एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहि‍णींच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. . राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी याबाबत दिली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. भंडाऱ्यातील काही लाडक्या बहिणींना काल (शुक्रवारी) 1500 रुपये खात्यावर जमा झाले आहेत. रायगड जिल्ह्यात देखील काल (शुक्रवारी) पासून लाडक्या बहिणींना योजनेचे हफ्ते मिळण्यास सुरुवात झाली आहे. येत्या एक ते दोन दिवसांमध्ये राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा योजनेचा हफ्ता मिळेल.

अदिती तटकरे यांनी याबाबत ट्विट करत म्हंटल कि, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत (Ladki Bahin Yojana) एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे.पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल. या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे.

एप्रिलचा हप्ता उशिरा का आला? (Ladki Bahin Yojana)

खरं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता साधारणपणे महिन्याच्या १५ किंवा २० तारखेच्या आसपास मिळतो. परंतु यावेळी एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा करण्यास उशीर झाला आहे. मार्च महिन्यानंतर नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असल्यामुळे तांत्रिक कारणास्तव एप्रिल महिन्याचा हफ्ता थकला असल्याचं बोललं जातंय… लाडक्या बहिणीची पैसे अजून जमा का झाले नाहीत? या विचाराने महिलावर्ग चिंतेत होता. परंतु आता आजपासून महिलांच्या खात्यावर १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे… उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही म्हंटल होत कि, लाडक्या बहिणीचं नियोजन केलं आहे आदिती तटकरे यांनी सांगितल्यानंतर तातडीने मी या निधीचं नियोजन करायला लावलं. सगळ्या योजनांचे पैसे देण्याचा प्रयत्न केला जातोय.