हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन Ladki Bahin Yojana August Installment । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. या यौजनेच्या माध्यमातून दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा केले जातात. आतापर्यंत लाडक्या बहीण योजनेतून एकूण 13 हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत… आता ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी येणार याकडे लाडक्या बहिणी डोळे लावून बसल्या होत्या. अखेर आज त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे.ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. आजपासून ऑगस्ट महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महिलावर्गात मोठं आनंदाचे वातावरण आहे.
अदिती तटकरे यांनी दिली खुशखबर – Ladki Bahin Yojana August Installment
याबाबत राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी x माध्यमावर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हंटल की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे. अदिती तटकरे यांच्या या ट्विटनंतर लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana August Installment) मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) September 11, 2025
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे.
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली… pic.twitter.com/oRnOcQxuzP
लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana August Installment) लाभाचं वितरण करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागाकडून महिला व बाल विकास विभागाला रक्कम वर्ग करण्यात येते. त्याप्रमाणं सामाजिक न्याय विभागानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाच्या वितरणासाठी 344.30 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग करण्यासंदर्भातील शासन निर्णय 9 सप्टेंबरला जारी करण्यात आला होता. त्यामुळं ऑगस्ट महिन्याच्या लाभाचं वितरण करण्यासंदर्भातील एक प्रक्रिया पूर्ण करण्यात आलीय.




