Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा धक्का!! सप्टेंबरपासून नोंदणी केल्यास मिळणार नाहीत 2 महिन्याचे पैसे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली असून या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत कलेची जात आहे/ आत्तापर्यंत लाखो महिलांच्या खात्यात जुलै आणि आगस्ट महिन्याचे मिळून असे ३००० रुपये जमा झाले आहेत. मात्र काही महिलांना तांत्रिक कारणाने अजूनही पैसे मिळाले नाहीत. तर काही महिलांनी अजूनही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेला नाही. अशा महिलांसाठी चिंतेची बातमी आहे. कारण 1 सप्टेंबर पासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्याचे पैसे मिळणार नाहीत. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली.

गडचिरोली दौऱ्यावर असताना अदिती तटकरे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून ही नोंदणी पुढेही कायम सुरूच राहणार आहे. मात्र ज्या महिन्यात नोंदणी होईल, त्याच महिन्यापासून त्या महिलेला लाभ मिळेल. आतापर्यंत 70 ते 75 टक्के महिलांची नोंदणी झाली असल्याची माहितीही मंत्री तटकरे यांनी दिली. त्यामुळे आता 1 सप्टेंबर पासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्याचे पैसे मिळणार नाहीत. मात्र या योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ घेण्यासाठी कोणतीही डेडलाईन नसल्याने महिलांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, अनेक महिलांचे आधार क्रमांक आणि त्यांचे बँक खाते एकमेकांची लिंक नसल्याने अजूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेलं नाही. त्यामुळे तुम्ही जर या योजनेचा अर्ज केला असेल, तर तुम्हाला आता तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याची लिंक आहे की नाही हे पाहणे खूप गरजेचे आहे. तसेच कोणते बँक खाते आधार कार्डची लिंक आहे. हे देखील माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमची बँक सीडींग स्टेटस जाणून घेणे आणि बँक खाते आधार क्रमांकला लिंक करणे खूप गरजेचे आहे.

बँक सिडींग असं चेक करा- Ladki Bahin Yojana

तुम्हाला जर बँक सीडींग स्टेटस टाक तपासायचे असेल, तर तुम्हाला युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला हवी ती भाषा निवडायची आहे.

त्यानंतर तुम्हाला आधार सर्विस हा पर्याय दिसत आहे.

पर्यावर क्लिक करून तुम्हाला आधार लिंकिंग स्टेटस हा पर्याय दिसेल.

हा पर्याय दिसल्यावर तुम्हाला एक नवीन विंडो ओपन होईल.

त्यावर बँक सिडींग स्टेटस हा पर्याय देखील दिसेल.

त्यानंतर त्या क्रमांकावर क्लिक करावे आणि तुमचा आधार क्रमांक आणि समोर दिलेल्या कॅपचा कोड टाकून लॉगिन करावे.

त्यानंतर आधार कार्ड सिलिंग असलेल्या तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल हा ओटीपी तुम्ही त्या वेबसाईटवर टाकावा त्यानंतर लॉगिन होईल.

यानंतर तुमचे बँक सीडींग स्टेटस या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या आधार क्रमांकशी कोणते बँक खाते लिंक आहे हे देखील तुम्हाला लगेच समजेल