Ladki Bahin Yojana : ‘या’ लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा दे धक्का!!

Ladki Bahin Yojana fadnavis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ladki Bahin Yojana। महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. सुरुवातीला २१ ते ६५ वर्ष वयोगटातील सर्वच महिलांना याचा लाभ देण्यात आला. मात्र आता काही दिवसांपासून अपात्र महिलांचा शोध सरकार घेत आहे. पात्रतेच्या निकषात न बसणारे आणि बोगस नाव नोंदवलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्याचा धडाका सरकारने लावला आहे. आज घडीला राज्यात एकूण 2 कोटी 63 लाख लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेत नोंदणी केली. त्यापैकी 2 कोटी 41 लाख महिला पात्र ठरल्या. म्हणजेच जवळपास राज्यभरात 26 लाख 34 हजार बोगस ‘लाडक्या बहिणीं’नी दरमहा दीड हजारांचा निधी घेऊन सरकारची फसवणूक केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या अपात्र ‘लाडक्या बहिणीं’ नावे वगळली जाणार आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.नागपूरमधील सातनवरी येथे एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

फडणवीस काय म्हणाले? Ladki Bahin Yojana

काही दिवसांपूर्वी लाडक्या बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) छाननी केल्यानंतर राज्यभरात तब्बल 26 लाख 34 हजार बोगस ‘लाडक्या बहिणीं’नी दरमहा दीड हजारांचा निधी घेऊन सरकारची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. यामध्ये काही महिला तर सरकारी कर्मचारी आहेत, काही महिला इन्कम टॅक्स भरत आहेत. सध्या महायुती सरकारला या लाडक्या बहीण योजणेमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे सरकारने या योजनेच्या पात्र महिलांची ई- केवायसी पद्धतीने पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात मोठा घोटाळा होत असल्याचे समोर आलं आहे. विशेष म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्राच्या जिल्ह्यात अपात्र महिलांची संख्या ही सर्वाधिक आहे. त्यामुळे या अपात्र महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळले जाईल

लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) गैरवापराची चौकशी सुरु आहे. ज्या लाभार्थ्यांनी चुकीच्या मार्गाने या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांचा लाभ बंद केला जाईल. मुंबई, पुणे आणि इतर मोठ्या शहरांमध्ये सुमारे 26 लाख महिलांनी या योजनेचा गैरवापर केला आहे. त्यामुळे यापुढे या योजनेचा लाभ थांबविण्यात येईल अशी भूमिका सरकारने घेतली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसला आहे.