ladki Bahin Yojana: महिला दिनी लाडक्या बहिणींना गिफ्ट; सरकारचा मोठा निर्णय

0
34
ladki Bahin Yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ladki Bahin Yojana – लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. पण मार्चमध्ये लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट मिळणार आहे. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्य त्यांच्या खात्यात दोन हप्ते जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे . म्हणजेच मार्च महिन्यात महिलांना 3000 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे लाखो महिलांना मोठी खुशखबर मिळाली आहे.

मार्चमध्ये महिलांना मिळणार दोन हप्ते (ladki Bahin Yojana)-

पडताळणीमुळे फेब्रुवारीचा हप्ता मिळण्यास वेळ झाला आहे. पण आता लाखो महिलांची प्रतीक्षा संपली आहे. या हप्त्याबद्ल मोठी अपडेट समोर आलीय. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा 8 मार्चला मिळणार आहे. तसेच मार्च महिन्याचा हप्ता हा अधिवेशनाच्या कालावधीमध्ये अर्थसंकल्पीय बजेट झाल्यानंतर विभागाच्या वतीने त्यांच्या खात्यात जमा केला जाईल.

आदिती तटकरेंनी दिली मोठी अपडेट –

आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले कि , या योजनेचा आतापर्यंत 2 कोटी 40 लक्ष महिलांपर्यंत (ladki Bahin Yojana) लाभ पोहचला आहे . तसेच आता सुद्धा महिलांना फेब्रुवारीचा आणि मार्च महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे. विरोधकांकडून सुरुवातीपासून आरोप केला जात होता , आधीपासूनच त्यांना हि योजना खुपते आहे. पण या योजनेला महिलांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे विरोधकांच्या मनात नैराश्य पसरलेले आहे आणि तेच ते बहिणींच्यामध्ये पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हे महायुतीने सरकार सक्षम आहे.

योजना कायम सुरु राहणार –

महायुतीच्या नेतुत्वाखाली लाडकी बहीण योजना (ladki Bahin Yojana)अशाच पद्धतीनुसार सक्षम आणि कार्यरत राहील . तसेच इथून पुढेही आम्ही हि योजना चालू ठेवणार आहोत , असे तटकरेंनी सांगितले