Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार? सरकार देणार डबल गिफ्ट

Ladki Bahin Yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. निवडणुकीच्या धामधुमीत सरकार लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट देण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. मात्र आता महिलांच्या खात्यात १५०० ऐवजी ३००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे. सरकार नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा दोन्ही महिन्याचे एकत्रित ३००० रुपये महिलांना देईल अशा चर्चा सुरु आहेत. असं झाल्यास नवीन वर्षांपूर्वीच महिलांना मोठं गिफ्ट मिळेल.

खरं तर सध्या डिसेंबर महिना सुरु झाला आहे. परंतु निवडणुकीमुळे आचार संहिता लागली आणि लाडक्या बहिणींचा (Ladki Bahin Yojana) हप्ता लांबला. डिसेंबरला सुरुवात होऊनही महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून मिळालेला नाही. त्यामुळे राज्यभरातील महिला निराश असून १५०० रुपये बँक खात्यात कधी जमा होणार याकडे डोळे लावून बसल्या आहेत. मात्र आता नाराज महिलांना पुन्हा खुश करण्यासाठी सरकार नोव्हेंबर आणि डिसेबर अशी दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्रितपणे बँक खात्यात जमा करेल असे बोलले जात आहे. अद्याप सरकारने याविषयीची कोणताही अधिकृत घोषणा केलेली नसली तरी पुढच्या आठवड्यात हे ३००० रुपये महिलांना मिळतील अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

E-KYC गरजेची Ladki Bahin Yojana

लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही अजूनही E-KYC केली नसेल तर घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करा आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या

सर्वात आधी ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जा

होम पेजवरील E-KYC वर क्लिक करा. आता E-KYC फॉर्म उघडेल

या फॉर्ममध्ये तुमचे आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड नोंदवा.

आधार ऑथिंटिकेशनसाठी सहमती द्या. ओटीपीवर क्लिक करा

आधाराला जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल.

हा ओटीपी सबमिट करा

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा केले जातात. थेट डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होतात. या योजनेमुळे महिलावर्गात मोठ्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळते.