Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट!! 1500 रुपये ‘या’ तारखेला मिळणार

Ladki Bahin Yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ladki Bahin Yojana । महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना सरकार कडून रक्षाबंधनाचे गिफ्ट मिळणार आहे. यंदाची रक्षाबंधन ९ ऑगस्टला आहे. त्यापूर्वीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे महिलांची रक्षाबंधन आणखी गोड होणार आहे. खरं तर जुलै महिन्याचे पैसे महिलांना कधी मिळणार अशी चिंता महिलांना लागली होती. मात्र अखेर सरकार कडून लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.

काय म्हणाल्या आदिती तटकरे? Ladki Bahin Yojana

अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणीच्या जुलै महिन्यातील हप्त्याबाबत माहिती देताना म्हंटल कि, लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) रक्षाबंधनाची भेट !! माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्मान निधी (१५०० रुपये) वितरित करण्यात येणार आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल. म्हणजेच काय तर ८ ऑगस्टला किंवा त्याच्या आधीच लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातील.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) महायुती सरकारनं जुलै 2024 पासून सुरु केली आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हाच या योजनेमागचा मुख्य हेतू होता. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. तर, पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीयोजने तील लाभार्थी शेतकऱ्यांना दरमहा 500 रुपये दिले जातात. राज्य सरकार अगदी तारेवरची कसरत करत लाडक्या बहिणींना पैसे देत असते. या योजनेला नुकतंच १ वर्ष पूर्ण झालं असून महिलावर्गात मोठ्या उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. . जुलै महिन्याच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी 2984 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती शासन निर्णयात देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच हे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होतील.