हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ladki Bahin Yojana । मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यात सरकार कडून १५०० रुपये जमा केले जातात. लाडकी बहीण योजनेला १ वर्ष पूर्ण झालं असून महिलावर्ग जून महिण्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्याच दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गुड न्यूज दिली आहे. लाडक्या बहिणींसाठी ३६०० कोटी डीबीटी खात्यात ट्रान्सफर केले असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. त्यामुळे आजपासून महिलांच्या खात्यात १५०० रुपये येण्याची शक्यता आहे.
महिलावर्गात आनंदाचे वातावरण – Ladki Bahin Yojana
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद संपन्न झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले, महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) राबविली जात आहे. या लाडक्या बहिणींकरिता पुढील हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाईल. अजित पवारांच्या या घोषणेमुळे महिलावर्गात आनंदाचे वातावरण पसरलं आहे. खरंतर जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकाच वेळी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला जाईल असा दावा करण्यात आला होता. जून महिन्याच्या हफ्त्याला उशीर होत असल्याने जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे पैसे सोबत दिले जातील असे म्हटले जात होते, परतू आता अजित पवारांनी सांगितल्याप्रमाणे आजपासुन महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील.
दरम्यान, आतापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे 2025 या कालावधीमधील एकूण 11 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत. आता या योजनेला वर्षपूर्ती झाली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) हि कधीही बंद होणार नाही, तर ती इथून पुढेही अशीच सुरू राहील असं सरकार कडून सातत्याने सांगितलं जात आहे.