Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2000 रुपये देऊ; काँग्रेस अध्यक्षांची मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळत आहेत. सरकारच्या या योजनेमुळे राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असून विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा सत्ताधाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. सरकारच्या या योजनेला मतदानावर फरक पडू नये यासाठी विरोधकांनी सुद्धा आम्ही सत्तेत आल्यास या १५०० रुपयांमध्ये आणखी वाढ करू असं म्हंटल होतं. याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रात आमचं सरकार आल्यास लाडक्या बहिणांना २००० रुपये देऊ असं खर्गे यांनी म्हंटल आहे.

2 हजार रुपये देणार – Ladki Bahin Yojana

दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी आज मल्लिकार्जुन खर्गे हे सांगलीत आले आहेत. यावेळी आपल्या भाषणात राहुल गांधी यांच्या समोरच खर्गे यांनी हि घोषणा केली. आमचं सरकार आल्यास लाडकी बहिण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) तुम्हाला 2 हजार रुपये देणार, तुम्ही तुमचा सन्मान मोदी यांच्यासमोर गहाण ठेवणार आहे का, ⁠मोदी सरकारने तोडण्या फोडण्याच्या पलिकडे काय केल ते सांगा, महाराष्ट्र जर जिंकला तर संपूर्ण देश आम्ही जिंकू आणि भाजपच सरकार जाईल असा विश्वास सुद्धा खर्गे यांनी व्यक्त केला.

भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २ तुकडे केले, दोन्ही पक्ष फोडण्यात आलेत त्यावरूनही मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधकांवर टीका केली. खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे आणि खरी राष्ट्रवादी शरद पवार यांच्यासोबत आहे असं खर्गे यांनी म्हंटल. मोदींनी छत्रपती शिवरायांचा पुतळ्याला हात लावला तो पडला, ⁠राम मंदीराला हात लावला ते मंदिर तिकडे गळत आहे, मोदींनी गुजराच्या पुलाचं उद्घाटन केल आणि तो पुल पडला, असं म्हणत मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही आपल्या भाषणात मोदींवर निशाणा साधला. राज्यात काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बनवली. त्यानंतर मोदींनी माफी मागितली. परंतु पंतप्रधानांनी कोणत्या कारणाने माफी मागितली. वेगवेगळी कारणे असतील. पहिलं कारण शिवरायांच्या मूर्तीचं कंत्राट संघाच्या कार्यकर्त्याला दिलं. दुसरं कारण मूर्तीच्या कामात भ्रष्टाचार झाला होता. मी ज्याला कंत्राट दिलं त्याने भ्रष्टाचार केला हे कारण असेल. म्हणून मोदींनी माफी मागितली, असं राहुल गांधी यांनी म्हंटल.