Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो मोबाईल चेक करा; 1500 जमा होण्यास सुरुवात

Ladki Bahin Yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ladki Bahin Yojana । महाराष्ट्रातील महिलांसाठी खुशखबर आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.मागील अनेक दिवस मे महिन्याचे पैसे कधी येतील या प्रतीक्षेत महिलावर्ग होता, मात्र आता अखेर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ लागले आहेत. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. तसेच लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहील असा विश्वासही अदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

काय म्हणाल्या अदिती तटकरे? Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू!! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या (Ladki Bahin Yojana) सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड् बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे.महायुती सरकारचा दृढ निश्चय, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे असं ट्विट अदिती तटकरे यांनी केलं.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण( Ladki Bahin Yojana) योजनेअंतर्गत हा ११ वा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होतोय. म्हणजेच लाडकी बहीण योजना सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत तब्बल 16500 रुपये महिलांना मिळाले आहेत. यापूर्वी एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम 7 मे रोजी महिलांना देण्यात आली होती, आता वटपौर्णिमेच्या निमित्ताने मे आणि जून महिन्याचे मिळून एकूण ३००० रुपये महिलांना मिळतील अशाही चर्चा सुरु होत्या, मात्र सरकारने आजपासूनच फक्त मे महिन्याचे १५०० रुपये वितरित करण्यास सुरुवात केली आहे.