Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा बदल; या महिलांना होणार फायदा

Ladki Bahin Yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ladki Bahin Yojana । महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. परंतु मागच्या काही महिन्यापासून या योजनेच्या पात्रतेसाठी वेगवेगळे निकष सरकार कडून लावण्यात येत असल्याने महिला हैराण झाल्या आहेत. यातीलच एक अट म्हणजे इ केवायसी. लाडकी बहीण योजनेचा 16 वा हप्ता जमा होण्यापूर्वी महिलांना ई-केवायसी करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. हे करत असताना महिलांना त्यांचा पती किंवा वडील यांचे आधारकार्ड दाखवायला लागतेय. परंतु एखाद्या महिलेला नवराही नसेल आणि वडीलही नसतील तर तिने काय करायचं? असा प्रश्न अनेक महिलांना पडतोय. या अडचणीमुळे आपले पैसे येण्याचं बंद तर होणार नाही ना? अशीही भीती या महिलांना होती. परंतु आता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी महिलांना मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे.

काय म्हणाल्या अदिती तटकरे ? Ladki Bahin Yojana

ज्या महिलांचा नवरा आणि वडील हयात नाही त्यांच्यासाठी आता केवायसी प्रोसेसमध्ये बदल करण्यात येणार आहे. याबाबत आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे. या महिलांसाठी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) वेबसाइटवर एक नवीन ऑप्शन दिला जाणार आहे. त्यामध्ये जाऊन केवायसी पूर्ण करता येईल. यामध्ये महिलांना वडिलांचे किंवा पतीच्या मृत्यूचा दाखला अपलोड करण्याची परवानगी मिळणार आहे. याचसोबत ज्या महिलांचा घटस्फोट झाला आहे त्या महिला घटस्फोटासंबंधित कागदपत्रे या नवीन वेबसाईट वर अपलोड करु शकतात. यावरुन महिलांचे पती आणि वडील हयात नसल्याची माहिती महिला व बालविकास विभागाला मिळेल आणि त्यांची पडताळणी करणे सोपे जाईल. या योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांना मिळेल,” अशी खात्री अदिती तटकरे यांनी दिली.

दरम्यान, मुख्यमंती माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणं बंधनकारकच आहे. आत्तापर्यंत या योजनेचे १५ हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आता १६ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत महिला आहेत. परंतु ई-केवायसी केल्याशिवाय १६ वा हप्ता महिलांना मिळणार नाही. त्यामुळे 18 नोव्हेंबर 2025 च्या आत महिलांनी त्यांच्या खात्याची ई केवायसी करावी आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ सातत्याने घेत राहावा.