Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेची मोठी अपडेट ; आता अंगणवाडी सेविकांकडून केली जाणार अर्जाची पडताळणी

Ladki Bahin Yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ladki Bahin Yojana – सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजनेची मोठी अपडेट समोर आली आहे. योजना सुरु झाल्यापासून ते आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. पण हि योजना सुरु होताना यामध्ये काही निकष समाविष्ट केले होते. पण याची महिलांकडून पूर्तता झाली नाही . या योजनेसाठी पात्र नसताना सुद्धा अनेक महिलांनी या योजनेचे फॉर्म भरले, पण आता हे रोखण्यासाठी सरकारने एक रामबाण उपाय शोधून काढला आहे . आता कोणती महिला अपात्र आहेत हे पाहण्यासाठी सरकारने अंगणवाडी सेविकांना घरी जाऊन पडताळणी करण्यास सांगितले आहे. तर चला नक्की हि बातमी काय आहे , याची पूर्ण माहिती जाणून घेऊयात .

अंगणवाडी सेविकांद्वारे होणार पडताळणी (Ladki Bahin Yojana)-

अंगणवाडी सेविकांद्वारे महिलांच्या घराची पडताळणी सुरू केली जाणार आहे. चारचाकी वाहन असलेल्या महिलांना योजनेचा लाभ देण्यात येणार नाही. जर घरात चारचाकी वाहन असण्याचे सिद्ध झाले, तर संबंधित महिलांना अपात्र करण्यात येणार आहे .

योजनेचे काही महत्वाचे निकष –

सरकारने जेव्हा हि योजना सुरु केली होती , तेव्हा काही निकषही दिले होते. त्यामध्ये अर्ज करणाऱ्या महिलेचे वय 18 ते 65 असायला पाहिजे. तसेच कुटुंबाचे वर्षाचे उत्पन्न अडीच लाख नाहीतर त्यापेक्षा कमी असावे . यासोबतच कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा. आणि घरी जर चारचाकी असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही, असे सविस्तरपणे सांगण्यात आले होते.

कोणत्या महिलेला लाभ मिळणार –

जर कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर चारचाकी असेल आणि लाभार्थी महिला पती किंवा मुलांसोबत वेगळ्या घरात राहात असेल, तर त्या महिलांना योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ मिळणार आहे. काही महिन्यांपूर्वी निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांना लाभ घेण्यापासून माघार घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण तरीही अपात्र महिलांनी अर्ज मागे घेतले नाहीत. त्यामुळे आता सरकार त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे पण वाचा : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत मोठी भरती; असा करा अर्ज