Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे श्रेय कोणाला? फडणवीसांनी सांगूनच टाकलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरांसाठी महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळते. हि योजना जरी महायुती सरकारची असली तरी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिन्ही नेते स्वतंत्रपणे श्रेय लाटत असल्याच्या चर्चा अधून मधून सुरु असतात. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने तर हि दादांची योजना आहे अशी जाहिरात सुद्धा टीव्हीवर दिली. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर लाडक्या बहीण योजनेचे खरे श्रेय कोणाला? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याना विचारला असता त्यांनी थेट नावच सांगून टाकलं.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस म्हणाले, लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे. ती मुख्यमंत्र्यांच्या नावानेच आहे. कोणत्याही सरकारच्या निर्णयाचे श्रेय मुख्यमंत्र्यांना असते. कारण मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंत्री काम करतो. यामुळे सरकारच्या सर्व निर्णयांचे आणि योजनेचे श्रेय मुख्यमंत्र्यांना असते. परंतु लाडकी बहीण योजनेचे श्रेय हे तिन्ही पक्षांना नाही तर आमच्या लाडक्या बहिणींना आहे, असे म्हणत फडणवीसांनी मोठ्या चतुराईने उत्तर दिले.

योजनेविरोधात काँग्रेस कोर्टात – Ladki Bahin Yojana

दरम्यान, लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विरोधक आधी म्हणाले, या योजनेसाठी सरकारकडे पैसे नाहीत, पण आम्ही बजेट मध्ये तरतूद करून ठेवली. आता ही योजना बंद व्हावी यासाठी काँग्रेसचे नेते कोर्टात गेले असा आरोपही देवेंद्र फडणवीसांनी केला. याचिका करणारे अनिल वलपल्लीवार हे आमच्या नागपूरचेच असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख आहेत. फक्त नाना पटोलेच नव्हे तर सुनील केदार, विकास ठाकरे यांचेही इलेक्शन एजंट अनिल वलपल्लीवार आहेत . फक्त लाडकी बहीण योजनाच नव्हे तर मुलींच्या शिक्षणाची योजना बंद करा, पिंक रिक्षा योजना बंद करा, शेतकरी अनुदानाची योजना बंद असा अशीही त्यांची मागणी आहे. यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात काय आहेत हे यातून समजते असं म्हणत फडणवीसांनी काँग्रेसवर टीका कलेची.