हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महिलांसाठी राज्य सरकारने आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) लवकरच बंद होणार असल्याचं भाकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केलं आहे. सरकारला दरवर्षी 60 हजार कोटींचा या योजनेचा बोजा आहे असं सांगत सरकारला हे काही परवडणार नाही असं राज ठाकरेंनी म्हंटल आहे. काल शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला, त्यावेळी आपल्या भाषणात राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर परखडपणे भाष्य केलं.
सरकारवर ६३ हजार कोटीचं कर्ज होईल- Ladki Bahin Yojana
राज ठाकरे म्हणाले, ही लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) … आता या लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये करणार असं सरकारने म्हंटल होते. जर २१०० रुपये केले तर साधारणपणे वर्षाला महाराष्ट्र सरकारवर ६३ हजार कोटीचं कर्ज होईल. म्हणजे पाच वर्षाचे तीन ते चार लाख कोटी होतात. हे पैसे फक्त वाटण्यासाठी. पण ते वाटू शकत नाहीत, कारण सरकारकडे पैसे नाहीत, त्यामुळे लाडकी बहीण योजना देखील योजना बंद होणार. कर्ज काढून दिवाळी साजरी करायला सांगितली कोणी? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
राज ठाकरे पुढे म्हणाले, निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी जातीचे राजकारण केले जाते. निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असं सांगितलं होतं. पण अजित पवार म्हणाले ३० तारखेपर्यंत कर्ज भरुन टाका, कर्जमाफी वगैरे काही होणार नाही. म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही वाट्टेल त्या गोष्टी बोलणार आणि निवडणुका संपल्यानंतर, लोकांनी भाबडेपणाने मतदान केल्यानंतर तुम्ही आता ऐन मोक्यावर बोलणार पैसे भरुन टाका म्हणून… अशा शब्दात राज ठाकरेंनी हल्लाबोल केला.
औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या सुरु असलेल्या वादावरही राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली. औरंगजेबाची सध्याची सजवलेली कबर काढून टाका. तेथे फक्त कबर दिसली पाहिजे आणि त्या ठिकाणी एक मोठा बोर्ड लावा. आम्हा मराठ्यांना संपवायाला आलेला औरंगजेब येथे गाडला गेला. हा आमचा इतिहास आहे”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.