हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्र सरकारने त्याचप्रमाणे राज्य सरकारने विविध गटातील नागरिकांसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत. ज्याचा फायदा देखील नागरिकांनी घेतलेला आहे. परंतु अनेक योजना आणून देखील लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला अपयश आले. त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केली. ज्या योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे आहे. या योजनेअंतर्गत जवळपास दोन कोटी महिलांना फायदा झालेला आहे. ही योजना संपूर्ण राज्यभरात गाजली तसेच लोकप्रिय झाली. या योजनेच्या अनेक हेडलाईन देखील तयार झाल्या आहेत. आणि आता हीच योजना आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारचा एक भक्कम आधार असल्याचे म्हटले जात आहे.
सरकार हे महिलांसाठी तसेच त्यांच्या सक्षमीकरणासाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असतात. आणि त्यातीलच एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना. या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी सरकारकडून दर महिन्याला 1500 रुपये देण्यात आलेले आहेत. 17 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहे. या योजनेचा अर्ज करण्यासाठी आत्तापर्यंत सरकारने अनेकवेळा मुदतवाढ देखील केलेली आहे.
दोन कोटी महिलांना लाभ
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही संपूर्ण राज्यातील महिलांसाठी एक आर्थिक पाठबळ देणारी योजना ठरली. परंतु विरोधकांनी मात्र या योजनेवर नेहमीच टीका करून फक्त निवडणुकीसाठी ही योजना आणली असल्याचा आरोप केलेला आहे. निवडणूक झाल्यानंतर ही योजना बंद पडणार आहे. तसेच दीड हजार रुपयांमध्ये महिलांचे काय होते? अशा अनेक टीका करण्यात आलेल्या आहेत. परंतु महिलांनी याकडे अजिबात लक्ष दिले नाही. आणि या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. आतापर्यंत तब्बल दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
भविष्यात मानधन वाढवणार
रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर या ही योजना चालू करण्यात आली. परंतु ही योजना बंद होणार असल्याची टीका विरोधकांनी केलेली आहे. परंतु ही योजना रक्षाबंधनापासून आता भाऊबीजेपर्यंत पोहोचलेली आहे. आणि भविष्यातही योजना सुरू अशीच राहणार आहे. असा विश्वास देखील महायुती सरकारने व्यक्त केलेला आहे. तसेच भविष्यात जाऊन या योजनेचे मानधन वाढणार असल्याचा विश्वास देखील महायुती सरकारने व्यक्त केलेला आहे.
डिसेंबर महिन्यात येणार सहावा हप्ता
आतापर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पाच हप्ते हे महिलांच्या खात्यात जमा झालेले आहे. आणि डिसेंबर महिन्यामध्ये सहावा हप्ता देखील येणार आहे. तसेच योजनेच्या निधीची अर्थसंकल्पात देखील तरतूद केलेली आहे. त्यामुळे भविष्यात जाऊन ही योजना बंद पडणार नाही. असे महायुती सरकारकडून सांगण्यात आलेले आहेत.
सरकारची 46 कोटींची तरतूद
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही फक्त निवडणुकीसाठीच आहे. असा आरोप विरोधकांनी केलेला आहे. परंतु या योजनेसाठी मागील अर्थसंकल्पाचे 40 हजार कोटींची तरतूद देखील केली असल्याने ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. तसेच या योजनेचा राज्याच्या आर्थिक स्तरावर कोणताही परिणाम झाला नाही. असे सरकारकडून देखील सांगण्यात आलेले आहेत. या योजनेचे यश पाहता सरकारने आगाऊ पैशांची देखील व्यवस्था केलेली आहे. आचारसंहितेच्या काळातही महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, म्हणून अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वीच महिलांना सलग दोन महिन्याचे 3000 रुपये आलेले आहेत.