लाडकी सुनबाई योजना!! सासुबाईच्या जेवणावर सुनबाईचे जेवण फ्री; कुठे आहे ऑफर?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात सध्या लाडकी बहीण योजना जोरदार चर्चेत आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारकडून केली जात आहे. या योजनेमुळे राज्यातील महिलावर्गात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. मात्र तुम्ही कधी लाडकी सुनबाई योजना ऐकली आहे? गंमत नाही हे खरं आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती येथील हॉटेल राजवाडा पार्क येथे हे ‘लाडकी सुनबाई योजना’ राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून सासुबाईच्या जेवणावर सुनबाईला फ्री मध्ये जेवण मिळत आहे. या योजेनबाबतचे बॅनर सुद्धा शहरात फिरत असून सर्वांचे लक्ष्य वेधलं जात आहे.

काय आहे व्हायरल बॅनरवर –

सोशल मीडियावर या लाडकी सुनबाई योजनेचा बॅनर व्हायरल होत आहे. तुम्ही बघू शकता कि एका रिक्षावर हा बॅनर लावण्यात आला आहे. त्यामध्ये लिहिले आहे कि, “हॉटेल राजवाडा पार्क, ‘लाडकी सुनबाई योजना’ सासुबाई च्या जेवणावर सुनबाई चे जेवण फ्री.

आवश्यक गोष्टी
१) सासूबाईला जेवायला घेऊन येणे आवश्यक आहे
२) सासुबाईंना जी थाळी देणार तीच थाळी सुनबाईंना फ्री मिळणार
३) कमीत कमी घरामधील पाच लोकांना जेवायला आणणे.

हे जेवण कुठे मिळणार याचा पत्ता सुद्धा सदर बॅनरवर देण्यात आला आहे. त्यानुसार, “हॉटेल राजवाडा पार्क, भिगवन रोड, टाटा मोटर्स समोर, श्रीनाथ ट्रान्सपोर्ट शेजारी बारामती. याठिकाणी जाऊन सासू आणि सुनबाई जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात. जास्तीत जास्त ग्राहकांनी हॉटेलला भेट द्यावी आणि जेवण करावं यासाठी हॉटेल मालकाकडून हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे.

pune_is_loveee या इन्स्टाग्राम अकाउंट वरून हा फोटो शेअर करण्यात आला असून या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हेच बघायचं राहिलं होतं. टॅग करा सासू सुनेच्या जोडीला. या अनोख्या ऑफर बद्दल अनेक यूजर्सनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने म्हंटल, “म्हणजे पाच थाळींवर एक थाळी फ्री” तर काही वापरकर्त्यानी हसण्याची इमोजी शेअर केली आहेत. आत्तापर्यंत ऐक हजार हुन अधिक लोकांनी हि पोस्ट लाईक केली आहे. पुणे तिथे काय उणे असं म्हणतात ते खरंच आहे. पुणेरी पाट्यांप्रमाणे आता पुणेरी बॅनर सुद्धा चर्चेत आले आहेत हे मात्र नक्की.