आता दर महिन्याला ५९५ रुपये गुंतवून बनू शकाल लखपती, ‘या’ सरकारी बँकेने सुरू केली ही योजना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येक व्यक्तीला शक्य तितक्या लवकर लक्षाधीश होण्याची इच्छा असते. मात्र योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे त्यांचे स्वप्न पूर्ण होत नाही. लोकांच्या या अडचणी लक्षात घेता एका सरकारी बँकेने आपल्याला लखपती बनवण्याची स्कीम सुरू केली आहे, हे बहुतेक लोकांना माहिती नाहीये. होय , अगदी बरोबर सेंट्रल बँक ऑफ इंडियाची सेंट लाखपति ही स्कीम लोकांना लाखपति बनवते. बँक म्हणते की आता तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा लक्षाधीश व्हा कारण आता ते तुमच्या हातात आहे. जर आपण असा विचार करत असाल की लक्षाधीश होण्यासाठी आपल्याला अधिक गुंतवणूक करावी लागेल. पण इथे आम्ही तुम्हाला सांगु की, या स्कीममध्ये तुम्ही दरमहा फक्त 595 रुपये गुंतवून लक्षाधीश होऊ शकता. चला तर मग या सेंट लखपती स्कीमबद्दल सर्व काही जाणून घेऊयात.

डिसेंबर 2016 मध्ये ही स्कीम सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ‘जब चाहो लखपति बनो …’ या टॅग लाइनसह सुरू केली होती. 1 वर्ष ते 10 वर्षे या स्कीम मध्ये गुंतवणूक करून आपण लक्षाधीश होऊ शकता. या स्कीम मध्ये जर तुम्हाला एका वर्षामध्ये लक्षाधीश व्हायचे असेल तर तुम्हाला दरमहा जास्त पैसे जमा करावे लागतील, जर तुम्हाला दहा वर्षांत लक्षाधीश व्हायचे असेल तर तुम्हाला दरमहा कमी पैसे जमा करावे लागतील.

ठेवींवर इतके व्याज मिळणार – या स्कीम अंतर्गत बँक आपल्याला दोन प्रकारचे व्याज दर देत आहे. एखाद्याला जर एका वर्षात लक्षाधीश बनायचे असेल तर त्याला ठेवीवर 6.65 टक्के व्याज दिले जात आहे. दुसरीकडे, एखाद्यास 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीत लक्षाधीश बनायचे असल्यास, त्याला 6.45 टक्के व्याज दिले जात आहे. याशिवाय बँक आपल्या माजी कर्मचार्‍यांना आणि ज्येष्ठ नागरिकांनाही आणखी काही खास ऑफर देत आहे.

1 वर्षात लक्षाधीश होण्यासाठी आपल्याला खूप गुंतवणूक करावी लागेल
जर तुम्हाला 1 वर्षात लक्षाधीश व्हायचे असेल तर तुम्हाला दरमहा 8040 रुपयांची गुंतवणूक सुरू करावी लागेल. जर आपण ही गुंतवणूक 1 वर्षासाठी केली तर बँक आपल्याला 1 वर्षा नंतर 1 लाख रुपये देईल. यासाठी 6.65 टक्के दराने व्याज दिले जाईल.

595 रुपये गुंतवून किती वर्षात लखपती बनता येईल ?
या सेंट लखपती स्कीम मध्ये तुम्ही दरमहा फक्त 595 रुपये गुंतवून दहा वर्षात लक्षाधीश व्हाल. दहा वर्षांसाठी दरमहा 595 रुपये गुंतवणूक केल्यानंतर बँक तुम्हाला दहा वर्षानंतर १ लाख रुपये देईल. यावर तुम्हाला 6.45 टक्के व्याज मिळेल.

5 वर्षात लक्षाधीश होण्यासाठी किती पैसे जमा करावे लागतील?
तुम्हाला जर 5 वर्षात लक्षाधीश व्हायचे असेल तर महिन्यात 1,411 रुपये पासून गुंतवणूक करावी लागेल. आपण ही गुंतवणूक 5 वर्षे करत राहिल्यास, बँक आपल्याला 5 वर्षानंतर 1 लाख रुपये देईल. या योजनेत 6.45 टक्के दराने व्याज दिले जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment