सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
जावली तालुक्यामध्ये मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीनंतर बोंडारवाडी व आसपासच्या गावांना वाहतुकीचा प्रचंड मोठा सामना करावा लागत होता. त्यामुळे खाजगी वाहतुकीचा मार्गाने प्रवास करावा लागत होता. खासगी वाहन चालकांकडून मनमानी पध्दतीने पैसे वसूल केले जात होते. शालेय विद्यार्थ्यांना दररोज आठ किलोमीटर चालत ये- जा पायपीट करावी लागत होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे मेढा ते बोंडारवाडी मार्गावर पुन्हा लालपरी धावू लागली आहे.
बोंडारवाडी व आसपासच्या गावातून शालेय विद्यार्थी, अबालवृद्ध नागरिकांची होणारी परवड लक्षात घेऊन या मार्गावर एस. टी वाहतुक सुरु व्हावी. यासाठी माजी आमदार सपकाळ, विधानसभा संपर्कप्रमुख एकनाथदादा ओंबळे, क्षेञप्रमुख एस. एस. पार्टे (गुरुजी), तालुकाप्रमुख विश्वनाथजी धनावडे, केळघर शहरप्रमुख बाळासाहेब शिर्के, नंदु चिकणे यांनी यासाठी यशस्वी पाठपुरावा व प्रयत्न केला.
शिवसेनेच्या पदाधिकारी यांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या एस.टीमुळे नागरिक व शालेय विद्यार्थ्यांनी शिवसेनेचे आभार मानले. बाहुळे या गावी शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने एस. टीचे पूजन करुन वाहक व चालक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने संपर्कप्रमुख एकनाथदादा ओंबळे, तालुकाप्रमुख विश्वनाथजी धनावडे, केळघर शहरप्रमुख बाळासाहेब शिर्के, माजी विभागप्रमुख नंदु चिकणे, वैद्यकिय कक्ष समन्वयक प्रशांत जुनघरे, युवासेना उपतालुकाप्रमुख दिपक पवार, शाखा प्रमुख राजाराम जाधव, जगन्नाथ जाधव आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.