औरंगाबाद : गोडाऊनचे शटर उचकटून चोरट्यानी 11 लाखांचा ऐवज चोरी केल्याची घटना इटखेडा, पैठण रोड जवळ घडली आहे. तब्बल 11 लाख 32 हजार 359 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना 4 जून रोजी 8.30 वाजेच्या सुमारास घडली.
एका इलेक्ट्रॉनिक गोडाऊनचे शटर उचकटून चोरट्यांनी 11 लाख 32 हजार 359 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. हा प्रकार सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर 4 जूनला वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बजाजनगर येथील मोरे चौकातील प्रतीक डिजिटल वर्ल्ड इलेक्ट्रॉनिक दुकानाचे मालक सुरजितसिंग छाबरा ( वय 59 रा. इटखेडा, पैठण रोड, औरंगाबाद ) यांनी दुकानातील शिल्लक माल ठेवण्यासाठी सी सेक्टर मधील 274 प्लॉट मध्ये गोडावून घेतले होते. त्या ठिकाणी सर्व माल ठेवण्यात येतो.
2 जून रोजी सुरजितसिंग छाबरा यांचा मुलगा प्रत्येक गोडाऊनमध्ये माल आणण्यासाठी गेला तेव्हा त्याला माल लंपास असल्याचे समजले. त्याने ही माहिती वडिलांना दिली असता छाबरा यांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली. दुकानातील एलईडी, एसी, वॉशिंग मशीन, फ्रीज या वस्तू चोरीला गेल्याची तक्रार दिली. अंदाजे 11 लाख 32 हजार 359 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करत आहेत.