Land Record : आता वारस नोंदणी थेट मोबाईल वरूनच करा; फॉलो करा ‘या’ स्टेप्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन (Land Record) | जेव्हा आपल्या घरातील कर्त्या पुरुषाचे दुर्दैवाने निधन झालं तर आपण त्यांच्या वारसाची नोंद सातबारा उताऱ्यावर करतो. यासाठी आपण साधारपणे तलाठी कार्यालयात चकरा मारतो, परंतु यामुळे आपला वेळ जातो आणि वेळेत आपलं कामही होत नाही. कधी कधी सर्व्हर डाउन, किंवा अधिकाऱ्यांनी गैरहजेरीत यामुळेच सर्वसामान्य माणसाचे मात्र हाल होतात. परंतु आता वारस नोंदणी करण्याबाबत सर्व चिंता सोडा. कारण त्यासाठी आम्ही एक खास सुविधा घेऊन आलो आहोत.

आपल्या वारसाची नोंद (Varas Nond) सातबाऱ्यावर लावायची असेल तर आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे अँप डाउनलोड करा. हॅलो कृषी वरून अगदी सहज आणि सोप्प्या पद्धतीने तुम्ही वारस नोंदणी करू शकता. याव्यतिरिक्त हॅलो कृषिमध्ये तुम्हाला जमीन मोजणी, सातबारा उतारा, फेरफार उतारा, हवामान अंदाज, सर्व पिकांचे बाजारभाव यांसारख्या सुविधा अगदी मोफत मिळत आहेत. याशिवाय, तुम्ही घरबसल्या सर्व सरकारी योजनांना अर्ज करून लाभही घेऊ शकता. त्यासाठी वेळ न घालवता आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करा

राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने जास्तीत जास्त सुविधा या ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये डिजिटल सातबारा (Digital Satbara) उतारा असेल किंवा इ फेरफार उतारा यांचा समावेश करण्यात आला आहे. तुमच्याही लक्षात आलं असेल कि कोरोना काळात आपल्यासारख्या अनेक नागरिकांनी ऑनलाईन सुविधांचा वापर वाढविला आहे. त्यामुळे भूमी अभिलेख विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर Hello Krushi हे अँप शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. याचे कारण म्हणजे हॅलो कृषीवर भूमिअभिलेखच्या सेवांसोबतच हवामान अंदाज, जमीन खरेदी विक्री, सरकारी योजना अर्ज करणे अशा विविध शेतकऱ्यांच्या फायद्याच्या बाबी देण्यात आल्या आहेत.

वारस नोंदीसाठी ‘असा’ करा ऑनलाइन अर्ज (Land Record)

सर्वात आधी Hello Krushi अँप डाउनलोड करा आणि ओपन करा. त्यानंतर आम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलोअ कराव्यात. लॉगिन करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज केल्यानंतर हा ऑनलाईन अर्ज संबंधित तलाठ्याकडे पाठवला जाईल. त्यानंतर तलाठी या अर्जाची ऑनलाईनच पडताळणी करतील जर तुम्ही यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कमी दिली असतील तर याबाबतची माहिती अर्जदाराला मेलच्या माध्यमातून देण्यात येईल. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

1) सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi हे मोबाईल अँप डाउनलोड करून घ्यायचे आहे.

2) Hello Krushi अँपवर नाव, मोबाईल नंबर आदी माहिती भरून मोफत रजिस्टर केल्यानंतर आता अँप ओपन करताच तुम्हाला होम स्क्रीनवर सरकारी योजना अशा विभाग दिसेल. त्यावर क्लिक करा.

3) आता तुम्हाला वारस नोंद हा पर्याय निवडायचा आहे. इथे सर्व माहिती देण्यात आली असून खाली Apply Now असे बटन दिसेल.

4) Public Data Entry हे पेज तुमच्या समोर ओपन होईल. या पेजच्या सर्वात खाली ‘Proceed to login’वर क्लिक करून आधी स्वत:चे ऑनलाइन खाते उघडा.

5) त्यानंतर तुमचं मोबाईल, पॅन नंबर, ई-मेल, पिन कोड टाका. देश, राज्य, जिल्हा टाकल्यावर ‘Select City’ मध्ये गाव निवडा. त्यानंतर Address Details मध्ये घराची माहिती टाका. शेवटी कॅप्चा टाका आणि ‘सेव्ह’ म्हणा.

6) त्यानंतर पेजखाली एक लाल अक्षरातील मेसेज दिसेल. त्यानंतर ‘Back’ बटणावर क्लिक करून पुन्हा एकदा लॉग-इन करा.

7) नोंदणी करताना टाकलेले यूझरनेम व पासवर्ड पुन्हा टाका. तसेच कॅप्चा टाकून लॉग-इन म्हणा. त्यानंतर ‘Details’चे पेज उघडेल. त्याठिकाणच्या पर्यायावरील ‘ ७/१२ mutations’ वर क्लिक करा.

8) ‘User is Citizen’ आणि बँकेचे कर्मचारी असल्यास ‘User is Bank वर क्लिक करा. एकदा यूझरचा प्रकार निवडल्यावर ‘Process’ वर क्लिक करा, ‘फेरफार अर्ज प्रणाली ई-हक्क’चे पेज ओपन होईल. तेथील माहिती भरल्यावर ‘तलाठ्यांकडे ज्या फेरफारसाठी अर्ज करायचा तो वारस नोंद पर्याय निवडा. त्यानंतर वारस फेरफार अर्ज उघडेल.

9) सुरवातीला अर्जदाराची माहिती भरून ‘पुढे जा’ वर क्लिक करा. त्यानंतर स्क्रीनवर अर्ज मसुदा जतन केल्याचा मेसेज येईल आणि त्यासमोर अर्ज क्रमांक असेल. मेसेजखालील ‘ओके’ बटनावर क्लिक केल्यानंतर मृताचे नाव किंवा खाते क्रमांक टाका, सातबारावरील खाते क्रमांक टाका. पुढे ‘खातेदार शोधा’वर क्लिक करून मृताचे नाव निवडा.

10) त्यानंतर संबंधित खातेदाराचा गट क्रमांक निवडून मृत्यू दिनांक टाका. त्यानंतर ‘समाविष्ट करा’ वर क्लिक करून खातेधारकाच्या जमिनीची माहिती तेथे दिसेल. त्यानंतर अर्जदार हा वारसांपैकी आहे का? असा प्रश्न येईल. होय, नाहीपैकी योग्य पर्याय निवडून ‘वारसांची नावे भरा’वर क्लिक करा.

11) वारस म्हणून ज्यांची नावे लावायची आहेत, त्यांची माहिती भरा. त्यानंतर इंग्रजीत नाव लिहा आणि मग जन्मतारीख टाका. वय टाकल्यानंतर पुढे मोबाईल नंबर आणि पिनकोड टाका. पुढील माहिती भरून पोस्ट ऑफिस निवडा. त्यानंतर पुढील माहिती भरा.

12) पुढे मृतासोबतचे तुमचे नाते निवडा व शेवटी ‘साठवा’ (सेव्ह) या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर दुसऱ्या वारसाचे नाव नोंदवायचे असल्यास तेथील ‘पुढील वारस’वर क्लिक करा आणि पूर्वीप्रमाणेच माहिती भरा व ‘साठवा’वर क्लिक करा.

13) वारसांची नावे भरल्यावर ‘पुढे जा’वर क्लिक करा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. मृत्यू दाखल्याची सत्यप्रत अपलोड करा. तसेच इतर कागदपत्रांमध्ये रेशनकार्ड जोडू शकता. मृत व्यक्तीच्या जमिनीचे ‘८-अ चे उतारेही लागतील.