हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (Land Records) । शेतकरी मित्रानो, सातबारा उतारा म्हणजे आपल्या गरजेचा आणि जिव्हाळ्याचा विषय… कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा शेतीसाठी कर्ज घ्यायचं असेल तर सर्वात अगोदर तुमचा सातबारा उतारा मागितला जातो. तसेच जमीन खरेदी विक्री करायच्या वेळेस सुद्धा संबंधित जमिनीच्या बाबतीत संपूर्ण माहिती तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला सातबारा, फेरफार किंवा खाते उतारा लागतोच. परंतु जुन्या म्हणजेच खूप वर्षांपूर्वीच्या जमिनीचा उतारा काढायचं म्हंटल तर डोकेदुखीच, इतकी जुनी कागदपत्र शोधून काढायची कशी या विचारानेच आपल्याला नको नको वाटत, पण आता चिंता करू नका. तुम्ही आता तुमच्या मोबाईल वरूनच 1880 पासूनचे सातबारा, फेरफार उतारा काढू शकताय. कसे ते आम्ही सांगतो.
मित्रानो, आता जग खूप पुढे गेलं असून शेतीमध्येही आता तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. शेतकऱ्याचे काम हलकं व्हाव यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी Hello Krushi हे अँप बनवण्यात आलं आहे. हॅलो कृषी वरून तुम्ही तुमचा सातबारा उतारा, (Land Records) फेरफार उतारे, डिजिटल सातबारा, भू- नकाशा अगदी काही मिनिटात आणि महत्त्वाचे म्हणजे 1 रुपया सुद्धा न करता काढू शकता. याशिवाय हॅलो कृषीच्या माध्यमातून तुमच्या शेतजमिनीची मोजणी, रोजच्या पिकांचा बाजारभाव, हवामान अंदाज पाहता येतो. इतकंच नव्हे तर सर्व सरकारी योजनांना अवघ्या एका क्लीक वर तुम्ही अर्जही करू शकता. आणि सर्व लाभ तुम्हाला फुकट मध्ये मिळत आहे. त्यासाठी सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवर जाऊन हॅलो कृषी डाउनलोड करा.
असा मिळवा तुमचा फेरफार उतारा (Land Records)
1) सर्वात आधी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi सर्च करा. आणि अँप डाउनलोड करा.
2) हॅलो कृषी अँप Install केल्यानंतर यामध्ये सर्वात आधी तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि शेतीविषयक आवश्यक माहिती भरा.
3) आता होम पेज वर जाऊन ‘सातबारा व भूनकाशा’ हा विभाग निवडा.
4) यामध्ये तुम्हाला सातबारा, डिजिटल सातबारा, भू-नकाशा, ई-चावडी, भूमी अभिलेख, जागेचे बाजारमूल्य. असे 6 विभाग दिसतील. यापैकी भूमी अभिलेख या विभागावर क्लिक करा.
5) नंतर पेजच्या उजव्या कोपऱ्यात भाषा असा पर्याय आहे त्यावर क्लीक करून तुमची भाषा निवडा
6) त्यानंतर समोरच लॉगिन व हेल्प असे दोन पर्याय तुम्हाला दिसतील. जर तुम्ही अगोदरच या वेबसाईटवर तुमची नोंदणी केली असेल तर तुम्ही लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून या साइटवर जाऊ शकता. परंतु जर तुम्ही आधी रजिस्टर केलंच नसेल तर तुम्हाला न्यू यूजर्स म्हणून केली नसेल तर तुम्हाला न्यू यूजर्स रेजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लीक करावी लागेल.
7) या ठिकाणी तुम्हाला तुमची सगळी पर्सनल म्हणजेच वैयक्तिक माहिती व्यवस्थित भरावी लागेल.
8)- तुम्ही कोणता व्यवसाय करता व तुमचा मेल आयडी, जन्मतारीख ही सर्व पर्सनल माहिती भरल्यानंतर तुमचा पत्ताही सविस्तरपणे भरावा.
9)- त्यानंतर लॉगिन आयडी तयार संकेतस्थळाच्या निर्देशानुसार तयार करावा व दिलेल्या निर्देशानुसार पासवर्ड टाकून घ्यावा.
10)- त्यानंतर चौकटीमध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील त्यातील कुठल्याही एका प्रश्नाचे उत्तर द्यावे आणि त्याच्याखालील कॅपच्या आहे तसा या चौकटीत टाईप करावा.
11) यानंतर सबमिट बटन वर क्लीक करा
12) आता तुमची वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली इथे क्लिक करा आणि लॉगिन करण्यासाठी असा मेसेज येईल व त्यावरील इथे क्लिक करा वर क्लिक करा.
13) – रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जे युजरनेम आणि पासवर्ड टाकला असेल तो परत लॉगिन करण्यासाठी वापरा.
आता असा पहा तुमचा फेरफार उतारा
1) या ठिकाणी दिलेल्या जिल्ह्यांपैकी तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा . त्यानंतर तुमचा तालुका आणि गावाचे नाव टाका. इथे तुम्हाला फेरफार उतारा, सातबारा आणि आठ अ उतारा इत्यादी प्रकारचे जवळजवळ 58 अभिलेखांचे प्रकार उपलब्ध आहेत.
2) त्यानंतर संबंधित जमिनीचा गट क्रमांक टाका आणि सर्च म्हणजे शोध या पर्यायावर क्लिक करा.
3) आता तुम्ही ज्या जमिनीचा गट क्रमांक टाकला आहे त्या जमिनीच्या संबंधित फेरफारशी संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल.
4) आता तुम्हाला या जमिनीच्या ज्या वर्षाचा फेरफार (Ferfar Utara) पाहायचा आहे ते वर्ष व क्रमांक टाका आणि मग तुम्ही त्या वर्षाचा फेरफार पाहू शकता.
5) त्यानंतर प्रिव्हू कार्ट म्हणजेच पुनरावलोकन कोर्ट या पर्यावर क्लिक करावे व त्यानंतर तुमचे कार्ट ओपन होते व त्याखाली पुढे जा या पर्यायावर क्लिक केलं की डाउनलोड Summary हे पेज ओपन होते व इथे तुमच्या फाईलचे स्टेटस तुम्हाला मिळते.
6) यानंतर तुम्ही समोरील फाईल पहा या पर्यायावर क्लिक केलं की तुमचे जमिनीचे फेरफार पत्रक तुमच्यासमोर ओपन होते