औरंगाबाद | राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांनी मोबाईलचा वापर टाळून लँडलाईन फोनचा वापर करावा असे आदेश काढले आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी खाजगी मोबाईल वापरत असल्यामुळे नागरिकांना त्यांच्याशी संपर्क साधण्यास अडचण येते. त्याचबरोबर पैठण तालुक्यात साधारणपणे सर्वच शासकीय लँडलाईन बंद आहेत.
नागरिकांकडे शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर नसल्यामुळे त्यांना शासकीय कार्यालयात छोट्या कामासाठीही यावे लागते. लँडलाईन चालू असला की छोट्या कामांसाठी ये-जा करावी लागत नाही. शासनाच्या आदेशानुसार शासकीय कार्यालयातील दूरध्वनी कधी सुरू होतील. याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वैयक्तिक मोबाईलचा शासकीय कामासाठी वापर करत असल्याचे दिसून आले. लँडलाईन फोन बंद असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोयीचे वाटते. मात्र सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे दिसून आले आहे.
पैठण तालुक्यातील पैठण तहसील कार्यालय, नगर परिषद, वैद्यकीय अधिकारी, पंचायत समिती, अग्निशमन न.प., महावितरण उपविभाग कार्यालय, सहायक निबंधक कार्यालय, कार्यकारी अभियंता पाटबंधारे जायकवाडी विभाग, सहायक कार्यकारी अभियंता दगडी धरण उपविभाग, जायकवाडी कार्यकारी अभियंता नियंत्रण व संपर्क अधिकारी, बसस्थानक पैठण आगार, मराठवाडा प्रशासकीय व प्रशिक्षण प्रबोधिनी, प्राथमिक आरोग्य केंद्र पाचोड, आडूळ, विहामांडवा व बिडकीन, अग्निशमन एम.आय.डी.सी., वजन मापे निरीक्षक, वन्यजीव विभाग, सामाजिक वनीकरण या कार्यालयातील लँडलाईन बंद आहेत.