Monday, January 30, 2023

लॉकडाऊनमध्ये महिनाभराचे भाडे थकल्याने मालकाने दुकानातील साहित्य फेकले रस्त्यावर

- Advertisement -

औरंगाबाद : लॉकडाउन काळात एक महिन्याचे दुकानाचे भाडे थकल्यामुळे दुकान मालकाने सलून चालकाचे सर्व साहित्य रस्त्यावर फेकल्याची घटना पानदरी भागात उघडकीस आली. यामुळे दुकानदार देविदास आसाराम जाधव यांचे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले आहे.

देविदास आसाराम जाधव यांचे ६० वर्षांपासून मॉडर्न हेयर कटिंग सलून हे वडिलोपार्जित सलून दुकान होते. लॉकडाऊन काळात सलून बंद असल्याने घर चालवणेही कठीण झाले असताना दुसरीकडे असे प्रकार समोर येत आहेत. याच सलून च्या दुकानावर देविदास यांचे संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा मात्र जागा मालक सुनंदा चंद्रकांत लकडे आणि दीपा सतीश लकडे यांनी दुकानातील सर्व सामान बाहेर रस्त्यावर फेकून दिल्याने सलून चालक व त्याचे कुटुंब हे अडचणीत आले आहेत. “माझ्याकडे आता आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही” असं माध्यमांशी बोलताना देविदास जाधव यांनी सांगितल आहे. घडलेल्या सर्व प्रकारानंतर सलून चालकाने सिटी चौक पोलीस ठाण्यात धाव घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.