कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी भूस्खलनांच्या दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. या दुर्घटनेत ज्यांची पूर्ण घरे उध्दवस्त झालेली आहेत. अशा भूस्खलानातील लोकांना सिडको आणि एमएसआरडीसीच्या माध्यमातून घरे बांधून देण्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केलेले आहे. त्याच्यासाठी लागणाऱ्या जागेची उपलब्धता करण्याचे काम महसूल विभागाचे काम सुरू आहे. जर जागा मिळाली नाही तर राज्य सरकार जागा खरेदी करण्याची तयारी आहे. जागा खरेदीसाठी तिथे नागरी सुविधा देण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी मान्य केलेले आहे. त्यामुळे लवकरच कायमस्वरूपी निवारणाचे काम जलद गतीने होणार असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
शंभूराज देसाई म्हणाले, कोयना परिसरात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झालेले आहे. प्रातिनिधीक स्वरूपात मिरगांव मधील परिवारांना तात्पुरत्या निवारणासाठी राहण्याची सोय करण्यात आलेली आहे. बैठकांना मी स्वतः आणि जिल्हाधिकारी उपस्थित होतो. अनेक गावांच्याकडे जागा आहेत, त्या मिळाल्या तर पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघणार आहे. तात्पुरत्या राहण्याची सोय जलदगतीने केले आहे, त्याचप्रमाणे कायम स्वरूपी राहण्याची सोय करण्यात येईल.
https://www.facebook.com/100006260862241/videos/1039206033584863/
आता येणाऱ्या 15 दिवसात 100 ते 125 कुटुंबांना तात्पुरत्या निवाराची सोय करण्यात येईल. कायम स्वरूपी निवारासाठी दोन बैठका शासनस्तरावर झालेल्या आहेत. पाटण मतदार संघातील कोयना विभागातील या लोकांच्या निवारणाची सोय करण्यासाठी मी कटिबध्द असून त्याबाबत लवकरच निर्णय शासनस्तरावर होईल, अशी आशा शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली.