Saturday, March 25, 2023

मराठवाड्यात कपाशी लागवडीत मोठ्या प्रमाणात घट

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। यावर्षी मराठवाड्यात दर वर्षीच्या तुलनेत कपाशी लागवडीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.  साधारण १५ लाख ९४ हजार ३०१ हेक्टर क्षेत्र असताना केवळ १४ लाख ६२ हजार ४७९ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. एकूण १ लाख ३१ हजार म्हणजे जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली नाही. एकूण केवळ ९२ टक्के क्षेत्रावरच लागवड झाली आहे. कृषी विभागाने जिल्हानिहाय लागवडीच्या क्षेत्रांची माहिती नुकतीच सांगितली आहे.

बीड जिल्ह्यात ३ लाख ५७ हजार हेक्टर, जालना जिल्ह्यात २ लाख ९० हजार १५१ हेक्टर तर औरंगाबाद जिल्ह्यात ३ लाख ९४ हजार २६७ हेक्टर लागवड क्षेत्र आहे. मात्र यावर्षी या ठिकाणी अनुक्रमे ३ लाख १८ हजार १४९ हेक्टर, ३ लाख ७ हजार ७ हेक्टर आणि ३ लाख ९१ हजार २६१ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. याप्रमाणेच हिंगोली जिल्ह्यात ८३ हजार ७३० हेक्टर इतके क्षेत्र लागवडीचे असताना खूपच कमी म्हणजे ३८ हजार ७९८ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली आहे. हे प्रमाण केवळ ४६% आहे. परभणीतही १ लाख ९५ हजार ७२० हेक्टर क्षेत्र असताना १ लाख ७६ हजार ५०१ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे.

- Advertisement -

नांदेड जिल्ह्यात ८२% क्षेत्रावर म्हणजे साधारण २ लाख ६० हजार ५०५ क्षेत्र असताना २ लाख १४ हजार ४८७ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही आधीच लागवड क्षेत्र कमी आहे त्यातही निम्म्या क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. १९ हजार ४४१ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ८ हजार १ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यात मात्र मोठ्या प्रमाणात म्हणजे २६६% प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. ३ हजार १३३ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ८ हजार २७५ क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे.