हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाईने उच्चांक गाठला असून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्यातच भरीस भर म्हणून की काय, महावितरणने इंधन समायोजन आकार म्हणजे FAC यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ केली आहे. त्यामुळे या वीज दरवाढीचा मोठा फटका राज्यातील जनतेला बसणार आहे.
जून महिन्यापासून पुढील पाच महिने म्हणजे ऑक्टोबर महिन्यापर्यंत इंधन समायोजन आकार वीज ग्राहकांच्या वीज बिलात लागू होणार असून, ही वाढ प्रतियुनिट सरासरी एक रुपया असणार आहे. विशेष म्हणजे जानेवारी 2022 मध्ये देखील महावितरणकडून प्रति युनिट 25 पैशांची दरवाढ करण्यात आली होती.
इंधन समायोजन आकारात किती वाढ झाली?
0 ते 100 युनिटसाठी आधी 10 पैसे, आता 65 पैसे
101 ते 300 युनिट आधी 20 पैसे , आता 1 रुपये 45 पैसे
301 ते 500 युनिट आधी 25 पैसे, आता 2 रुपये 05 पैसे
501 युनिटच्या वर आधी 25 पैसे, आता 2 रुपये 35 पैसे
दरम्यान, या नवीन वीज दरानंतर जर तुमचे बिल यापूर्वी ५०० रुपये येत असेल तर आता ५८० रुपये येईल. तसेच तर १ हजार रुपये वीज बिल येत असेल तर १ हजार २०० रुपये येईल