जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट; रुग्ण बरे होण्याचा दर पोहोचला 92% वर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज  कोरोना बाधित रुग्णांमध्ये प्रचंड प्रमाणात घट झालेली दिसून आली आहे. गेल्या 100 दिवसांमधील सर्वात निचांकी रुग्ण संख्या आढळून आली आहे. आज दिवसभरात 76 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 51002 झाली.  त्याच प्रमाणे 438 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या 2622 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 47153 रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आज 05 मृत्यू झाले असून आतापर्यंत एकूण 1226 रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. एकूण 1648 पॉझिटीव्ह रुग्णांना होम आयसोलेशन ठेऊन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे- जळगाव शहर 8, जळगाव ग्रामीण 1, भुसावळ 11, अमळनेर 11, चोपडा 13, पाचोरा 02, भडगाव 02, धरणगाव 00, यावल 9, एरंडोल 2, जामनेर 3, रावेर 1, पारोळा 10, चाळीसगाव 2, मुक्ताईनगर 00, बोदवड 1  अशी रुग्ण संख्या आहे.

दिलासादायक ठरणारी आजची रुग्णसंख्या असून जिल्ह्यात आज अवघे 76 बाधित रूग्ण आढळले तर कोरोनातून मुक्त होणाऱ्या रूग्णांची संख्या 438 अशी आहे. जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्क्यांपर्यत वाढले असून मृत्यूदर 2.40% पर्यत खाली आला आहे.


Leave a Comment