५ वर्षात झालेला विकास हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे – नितीन गडकरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । ‘गेल्या ५ वर्षात भाजप सरकारच्या काळात झालेला विकास हा फक्त ट्रेलर आहे पिचर अजून बाकी आहे’ असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवडणूक प्रचारात विश्वास व्यक्त केला. गडकरी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभेत भाजप उमेदवार कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.

सभेला संबोधित करतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विकास आराखडा सांगताना म्हणाले की, आघाडीच्या १५ वर्षात जो विकास झाला नाही तो विकास ५ वर्षात भाजप सरकारने करून दाखवला आहे. काँग्रेसने मागील ७५ वर्षात केलेल्या चुकीच्या धोरणांमुळे आजही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत अशी टीका काँग्रेसवर करत कृषिक्षेत्राला नवी दिशा देण्याची गरज आहे असल्याचे गडकरी म्हणाले.

‘जनतेची गाडी जरी चांगली असली तरी चालक बरोबर नसल्याने विकास थांबला होता, मात्र मागील काळात योग्य चालक निवडल्याने विकास जनतेसमोर दिसतो आहे’ असा दावाही गडकरी यांनी यावेळी केला.

 

Leave a Comment