लता मंगेशकर अध्यासन केंद्राला कुटुंबीयांचा आक्षेप; कुलगुरूंना पाठवले पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई विद्यापीठातील अध्यासन केंद्र हे लता दीदींच्या नावाने सुरु करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आलेला आहे. मात्र, या निर्णयावर मंगेशकर कुटुंबियांनी आक्षेप घेतला आहे. हा निर्णय कुटुंबियांना विश्वासात न घेता घेण्यात आला. त्यामुळे हा निर्णय मान्य नसल्याचे कुटुंबियांनी या पत्राद्वारे म्हटलं आहे.

लता मंगेशकर यांच्या कुटुंबियांच्यावतीने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांना पत्र पाठविण्यात आलेले आहार. त्या पत्रात विद्यापीठाने प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांच्या नावे ‘सेंटर फॉर एक्सलेंस इन लाइट म्युझिक’ हे अभ्यास आणि संशोधन केंद्र स्थापन करण्याच्या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे.

कुलगुरूंना पाठविण्यात आलेल्या या पत्रात म्हंटले आहे की, लता मंगेशकर यांच्या नावे अध्यासन केंद्र सुरू करण्यापूर्वी मंगेशकर कुटुंबीयांना विश्वासात घेणे अपेक्षित होते. हा निर्णय आम्हाला मान्य नसून यापुढे लता मंगेशकर यांच्या नावे कोणताही उपक्रम परस्पर हाती घेऊ नये, असेही मंगेशकर कुटुंबीयांनी म्हटले आहे.