मित्राला भेटायला गेला मात्र माघारी घरी परतलाच नाही, दुसऱ्या दिवशी संशयास्पदरित्या आढळला मृतदेह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एक 19 वर्षीय विद्यार्थी मित्राला भेटायला जातो, असं सांगून घराबाहेर पडला तो माघारी घरी परतलाच नाही. त्याच्या कुटुंबियांनी त्याला शोधण्याचा प्रचंड प्रयत्न केला. पण तरीही त्याचा शोध लागत नव्हता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एका महाविद्यालयाच्या परिसरातील मुतारीत गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह (suicide) आढळला. संबंधित घटना ही लातरू जिल्ह्यातील अहमदपूर या ठिकाणी घडली आहे. अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालय परिसरातील मुतारीच्या असलेल्या लोखंडी चॅनल गेटला भगव्या उपरणेच्या साह्याने गळफास घेऊन (suicide) या तरुणाने आत्महत्या केली आहे. रामचंद्र उर्फ निशांत नारायण कोनाळे असे आत्महत्या(suicide) करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
निशांत हा 19 जुलैला संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास मित्राला भेटून येतो, असं सांगून घरातून बाहेर पडला होता. पण त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्याच्या कुटुंबियांनी त्याला शोधण्याचा प्रचंड प्रयत्न केला. पण त्याचा कुठंच पत्ता लागला नाही. निशांतच्या मित्रांनीदेखील त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास शहरातील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या परिसरातील असलेल्या मुतारीच्या लोखंडी चॅनल गेटला भगव्या स्कार्फच्या साहाय्याने गळफास (suicide)  घेतलेल्या अवस्थेमध्ये निशांतचा मृतदेह आढळून आला.

यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला त्यानंतर त्याचा मृतदेह (suicide) शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल

शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय

Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???

सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???

ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!

Leave a Comment