हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विलासराव देशमुख या नावानं लातूरला (Latur) सामाजिक, आर्थिक आणि राजकीय ओळख मिळवून दिली…. काम करण्याची इच्छाशक्ती असेल तर कितीही संकट आली तरी बदल हा होतोच, हे विलासरावांच्या राजकारणाने दाखवून दिल… महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले विलासरावांच्या राजकारणाचा बेस याच मतदारसंघात तयार झाला… आणि आता त्यांच्या पश्चातही तोच वारसा सुपुत्र धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) पुढे चालवतायत… विलासराव देशमुखांचा मतदारसंघ म्हणून ओळख असणाऱ्या या लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख गुलाल उधळून ही परंपरा अशीच चालू ठेवणार का? रमेश कराड हे नाव देशमुखांना येत्या विधानसभेला जड जाऊ शकतं का? या सगळ्या प्रश्नांसोबतच लातूर ग्रामीण विधानसभेचा सातबारा पाहूया,
शिवराज पाटील आणि नंतर विलासराव देशमुख यांच्यामुळे लातूरमध्ये फक्त आणि फक्त काँग्रेसचीच हवा आहे… इथला मतदारही नेहमी काँग्रेसशीच एकनिष्ठ राहिला… त्याचाच परिणाम म्हणूनच की काय भाजपने देशमुखांचा हा बालेकिल्ला फोडण्याचा कित्येकदा प्रयत्न करूनही तो इथल्या जनतेनं नेहमीच हाणून पाडला… तसं पाहायला गेलं तर मतदारसंघ पुनर्रचनेपूर्वी म्हणजेच 2009 पूर्वी लातूर ग्रामीण हा मतदारसंघ रेनापुर या नावाने ओळखला जायचा… आणि इथले आमदार असायचे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे… होय… लातूर आणि बीड अगदीच चिकटून असल्यामुळे इथल्या सामाजिक अस्तित्वा सोबतच इथलं राजकारणही एकमेकांच्यात मिसळून जायचं… पण 2009 ला रेनापुर, लातूर आणि औसा तालुक्यातील काही गावांचा मिळून नवा लातूर ग्रामीण विधानसभा अस्तित्वात आला… बदलती समीकरण लक्षात घेऊन यानंतर हा मतदारसंघ काँग्रेसचा झाला… 2009 ला वैजनाथ शिंदे यांना देशमुखांनी तिकीट देऊन निवडून आणलं…यानंतर 2014 ला त्र्यंबक भिसे हे विजयी झाले… 2019 ला मात्र देशमुखांची पुढची पिढी राजकारणात उतरली… जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात उतरलेल्या धीरज देशमुखांनी भाजपच्या रमेश कराड यांना मात देत काँग्रेसचा गड सेफ केला… आणि मतदार संघ तयार झाल्यानंतर काँग्रेसकडे असला तरी देशमुख कुटुंबाकडे हा मतदारसंघ सुपूर्त झाला…
लातूर ग्रामीण बाबत स्पेसिफिक बोलायचं झालं तर या पट्टयात विलासराव देशमुखांनी आधीपासूनच मतदार संघासाठी निधी आणून विकासकामं केली आहेत… त्यामुळे विकासाच्या मुद्द्याची लाईन पुढे रेटत याही टर्मला धीरज देशमुख प्रचार करताना दिसतील… त्यात पाच साखर कारखाने आणि जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या राजकारणावर होल्ड असल्यामुळे सहकार आणि शेतकऱ्यांशी त्यांचा थेट कनेक्ट येतो… अगदी जिल्हा परिषदेपासून ते बाजार समित्यांवरही देशमुख बंधूंची एक हाती सत्ता राहिलीये… त्यामुळे याही टर्मला धीरज देशमुखांना विजयी होण्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट घेण्याची गरज पडणार नाही, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे… फक्त कारखानदारी व्यतिरिक्त इतर औद्योगिक प्रकल्प नसणे आणि घराणेशाहीचा ठपका या गोष्टीच त्यांना सध्या तरी मायनस मध्ये घेऊन जातायत…विधानसभेला नेमकं काय होईल? याची लिटमस टेस्ट समजल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी तब्बल 17 हजारांचं घसघशीत लीड मिळवून देण्यात देशमुखांना यश आल्याने धीरज देशमुखांची आमदारकी सध्या तरी सेफ झोनमध्ये आहे, असं प्रेडिक्शन आपल्याला करता येऊ शकतं…
इथल्या जातीय समीकरणांचा विचार करायचा झाला तर इथं मराठा समाजाचं वर्चस्व असल्याचं पाहायला मिळतं… तर औसा तालुक्यात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावर आहे… तरुणांच्या हाताला काम नसण आणि रखडलेली लग्न हे देखील लातूर ग्रामीणचं सामाजिक वास्तव होऊन बसलय…. भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश आप्पा कराड लातूर ग्रामीणचे संभाव्य उमेदवार असतील, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे… त्यामुळे कराड विरुद्ध देशमुख अशी इंटरेस्टिंग लढत यावर्षी मतदारसंघात पाहायला मिळू शकते… भाजपाकडून रमेश कराड यांना दोन वेळा संधी देण्यात आली होती. दोन्ही वेळेस रमेश कराड यांचा पराभव झाला होता. 2019 मध्ये तिसऱ्या वेळेस संधी घेऊन रमेश कराड यांना लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडून यायचं होतं. मात्र, ऐनवेळी ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. पंधरा वर्षापासून तयारी करणार रमेश कराड यांना तो मोठा झटका होता.
धीरज देशमुख यांची पॉलिटिकल लॉन्चिंग यामुळे अतिशय सोपी झाली होती. धीरज देशमुख नकोत आणि नोटाला मतदान करा असा प्रचार यावेळी करण्यात आला… त्याचाच इम्पॅक्ट म्हणून काँग्रेस नंतर दोन नंबरची सर्वाधिक मतं ही नोटाला पडली होती, यावरून कराड हे इथले तगडे उमेदवार आहेत हे नाकारून चालत नाही… .पण लोकसभेच्या निकालाचा अंदाज, बंधू अमित देशमुखांचा जिल्ह्यावर आलेला होल्ड आणि राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची ताकद पाठीशी लागणार असल्याने धीरज देशमुख यांचं पारड सध्यातरी जड दिसतंय… असं म्हणायला हरकत नाही…. एकूणच लातूर ग्रामीण देशमुख जिंकतीलच… पण सर्वसामान्यांच्या जीवन मरणाच्या आणि रोजंदारीच्या प्रश्नांवर इथल्या लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर तोडगा काढावा, एवढी काय ती अपेक्षा… बाकी लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख आणि रमेश कराड यांच्यात लढत झालीच, तर निवडून कोण येईल? तुमचा कौल कुणाला? ते आम्हा
ला कमेंट करून नक्की सांगा…