मित्रांचा आग्रह नडला ! नवरदेवाला हळदीच्या दिवशी तलवार नाचवून डान्स करणे पडले महागात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूरमध्ये एका नवरदेवाला आणि त्याच्या मित्रांना लग्नाचा अतिउत्साह महागात पडला आहे. या नवरदेवाच्या हळदीच्या कार्यक्रमात हातात तलवारी घेऊन नाचणे नवरदेव आणि त्याच्या मित्रांना चांगलेच महागात पडले आहे. हातात तलवार आणि कोयते घेऊन नाचणाऱ्या नवरदेव आणि त्याच्या मित्रांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये पाच जणांना अटकसुद्धा करण्यात आली आहे. मात्र नवरदेव फरार झाला आहे. लातूर पोलिसांकडून फरार नवरदेवाचा शोध सुरु आहे.

नेमकं काय घडलं?
लातूर शहरातल्या एलआयसी कॉलनी भागात हळदीचा कार्यक्रम सुरु होता. यामध्ये काही तरुण मोठ्या कर्कश्श आवाजत डीजे लावून हातात तलवारी घेऊन धिंगाणा घालत होते.

हळदीच्या धिंगाण्यात पोलिसांची एन्ट्री
पोलिसांना हळदी समारंभाच्या नावाखाली धिंगाणा सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलीस आल्याचे पाहून या सगळ्यांची धावपळ सुरु झाली.

सात जणांवर गुन्हा दाखल
यानंतर पोलिसांनी तलवारी ताब्यात घेऊन सात जणांवर गुन्हा दाखल केला. त्यातल्या पाच जणांना विवेकानंद पोलिसांनी अटकसुद्धा केली. मात्र या दरम्यान नवरदेव शुभम तुमकूटे हा फरार झाला आहे. ऐन लग्नाच्या दिवशीच पसार होण्याची वेळ नवरदेवावर त्याच्या मित्रांमुळे आली आहे. विवेकांनद चौक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.