लातुर प्रतिनिधी | देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची संख्या ५०० च्या वर पोहोचली आहे. आता लातूर जिल्ह्यातही कोरोनाचे ८ रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात भितीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी परराज्यातून बारा नागरीक एका वाहनाने लातुर येथील निलंगा येथे आले होते. रात्रभर ते इथे राहिले, पण याची कोणालाही खबर नव्हती. शुक्रवारी सकाळी ही बातमी सर्वत्र पसरली. प्रशासन व पोलिसांना तातडीने त्यांना ताब्यात घेवून त्यांचे स्वॅब पुण्याच्या प्रयोगशाळेला पाठवले होते. या पैकी आठ जणांचे नमुने पॉझिटीव्ह आल्याने लातूर जिल्हा हादरला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, नंदियाल (जि. कर्नूल, तेलंगना) येथील बाराजण हरियानातील फिरोजपूर या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमला गेले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी तेथील महसूल यंत्रणेचे पास घेतला. त्यानंतर परतीचा स्वतःकडील वाहनाने परतीचा प्रवास सुरु केला होता. आठ नऊ दिवसापूर्वी त्यांनी हा प्रवास सुरु केला. खरे तर ते आतापर्यंत तेलंगानात जाणे आवश्यक होते. पण ते गुरुवारी उस्मानाबाद येथून निघून निलंगा येथे आले. एका धार्मिक स्थळी राहिले. शुक्रवारी परराज्यातील बारा व्यक्ती निलंग्यात येवून थांबल्याची माहिती सर्वत्र पसरली. महसूल प्रशासन व पोलिसानाही याची माहिती मिळताच त्यांची झोपच उडाली. तातडीने या व्यक्ती ज्या ठिकाणी राहिल्या त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱयांनी भेट दिली. त्यांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून हरियानातून घेण्यात आलेला परवान्याची शहानिशा करण्यात आली. परराज्यातून आल्याने त्यांना तातडीने लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यांचे स्वॅबचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेला पाठवण्यात आले होते. शनिवारी नमुन्याचा अहवाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाला. या बारापैकी आठ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणा, प्रशासन, व पोलिस यंत्रणेसोबतच लातूरकरांची झोप उडाली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?
पुण्यात करोनाने घेतला दोघांचा बळी; राज्यातील मृतांचा आकडा वाढला
राज्यातील लॉकडाउन काही आठवडे आणखी लांबणार?; राजेश टोपेंनी दिले संकेत
अंडरवर्ल्ड डाॅनची क्वीन’वर नजर; पॅरोलवर सुटताच डॅडी अरुण गवळीचा नवा ‘गेम
उद्धव ठाकरेंनी जिचं कौतुक केलं ‘ती’ आराध्या आहे तरी कोण..